li.तुम्हाला हल्ली कशातच
रस का उरला नाहीये.il
(जाणून घ्या त्यामागचं रंजक न्यूरोसायन्स)
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/8/2026 :
सकाळपासून रात्रीपर्यंत फोन स्क्रोल करणं, सतत काहीतरी नवीन शोधणं, पण तरीही मनामध्ये एक पोकळी किंवा कायमचा कंटाळा जाणवल्यासारखं वाटतंय का.? जर तुमच्या सोबतही असंच होत असेल, तर एकटा तुमचाच हा प्रॉब्लेम नाहीये. आजची पिढी एका मोठ्या मानसिक समस्येचा सामना करत आहे. म्हणुनच यामागचं खरं वैज्ञानिक कारण समजून घेऊया.
१. गाण्याचं उदाहरण आणि प्रेडिक्शनचा खेळ :
आठवून बघा, शेवटचं असं कधी झालं होतं जेव्हा तुम्ही एखादं नवीन गाणं ऐकलं आणि तुम्ही त्याच्यावर अक्षरशः वेडे झालात.? तुम्ही ते गाणं २०० वेळा ऐकलं, मित्रांना ऐकवलं. पण काही दिवसांनी ती जादू अचानक गायब झाली. गाणं तेच होतं, तुम्हीही तेच होतात, मग बदललं काय.? बदलला तुमचा मेंदू (Brain). मेंदूने त्या गाण्याची प्रत्येक बीट आणि लिरिक्स पाठ (Predict) करायला सुरुवात केली होती. आणि जेव्हा मेंदूला आधीच सर्वकाही माहीत असतं, तेव्हा तो त्याबद्दल उत्सुक (Excited) होणं बंद करतो,
२. इच्छा असणे (Wanting) आणि आनंद मिळणे (Liking) यातला फरक :
आपल्याला काय वाटतं.? आपण तासनतास रील्स का बघतो.? कारण आपल्याला त्यात मजा येते. पण न्यूरोसायन्स सांगतं की हा आपला समज पूर्णपणे चुकीचा आहे. मेंदूमध्ये Wanting (हवंसं वाटणं) आणि Liking (आनंद मिळणं) हे दोन पूर्णपणे वेगवेगळे सर्किट्स आहेत. डोपामिन आपल्याला एखादी गोष्ट सतत करण्यासाठी भाग पाडतो (Wanting), पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण त्यात खऱ्या अर्थाने आनंद (Enjoy) घेत आहोत. म्हणूनच, दोन तास रील्स स्क्रोल केल्यावरही शेवटी आपल्या हातात फक्त थकवाच उरतो,
३. मेंदू सरप्राइजवर चालतो, रिवॉर्डवर नाही : (Reward Prediction Error)
शास्त्रज्ञांच्या प्रयोगांमध्ये असं सिद्ध झालं आहे की, मेंदू आधीपासून ठरलेल्या गोष्टींवर खुश होत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळण्याची खात्री असेल, तर मेंदूचा डोपामिन स्पाइक झिरो होतो. डोपामिन तेव्हाच रिलीज होतो, जेव्हा वास्तविकता अपेक्षेपेक्षा चांगली किंवा अनपेक्षित (Surprise) असते. पण आज आपण सतत फोनच्या माध्यमातून हाय डोसेज रिवॉर्ड्स घेत आहोत, ज्यामुळे आपल्या मेंदूचे डोपामिन रिसेप्टर्स कमकुवत (Down Regulation) होत चालले आहेत. परिणामी, साध्या आणि सुंदर गोष्टींमध्ये रस वाटणं बंद झालं आहे. ही स्थिती पुढे जाऊन अनाडोनिया (Anhedonia आयुष्यातला आनंद अनुभवण्याची क्षमता गमावणे) कडे नेऊ शकते,
या समस्येवर मात करण्यासाठी ३ आठवड्यांचा सोपा उपाय : (Protocol)
या डिजिटल ट्रॅपमधून बाहेर पडून स्वतःला रीसेट करण्यासाठी तुम्हाला खालील ३ टप्पे फॉलो करावे लागतील,
आठवडा १- वजा करा : (Subtract)
सगळ्यात आधी ६० सेकंदापेक्षा लहान असणारे शॉर्ट्स, रील्स, डूम स्क्रोलिंग पूर्णपणे बंद करा, कारण हे मेंदूला झटपट हिट्सची सवय लावतात. दिवसातून किमान २० मिनिटे कोणतीही स्क्रीन न वापरता शांत बसून राहा. कंटाळा (Boredom) ही कोणतीही वाईट गोष्ट नाही, तर तो मेंदूला सर्जनशील (Creative) बनवण्यासाठी आणि स्वतःला रीसेट करण्यासाठी सर्वात मोठी मोकळी जागा देतो,
आठवडा २- नवीन जोडणी करा :(Rewire)
एकदम ५०० पानांचं पुस्तक वाचायला घेऊ नका. सुरवात १०-२० मिनिटांच्या साध्या वाचनाने करा. आयुष्यात छोटे-छोटे अनपेक्षित बदल (Surprises) आणा. उदा. ऑफिस किंवा कॉलेजला जाताना एखादा नवीन मार्ग निवडा, एखाद्या जुन्या मित्राला फोन करा, किंवा एखादी नवीन स्किल शिकण्याचा प्रयत्न करा,
आठवडा ३- पाया मजबूत करा : (Foundation)
कोणत्याही तडजोडीशिवाय दररोज ७ ते ८ तासांची गाढ झोप घ्या. कारण झोपेविना मेंदू रिकव्हर होऊ शकत नाही. झोपताना फोन स्वतःपासून लांब ठेवा आणि प्रत्यक्ष मानवी संवाद (Face-to-face conversations) व शारीरिक हालचालींवर भर द्या,
निष्कर्ष :
आयुष्यात कधीकधी कशात रस न वाटणं हा आपला दोष नसून, तो आपल्या मेंदूचा एक ट्रॅप असतो. वेळ अजूनही गेलेली नाही, आजच एक छोटासा बदल करा आणि आयुष्याचा खरा आनंद पुन्हा अनुभवायला सुरुवात करा,
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,
꧁꧂🥳꧁꧂

0 टिप्पण्या