धाईंजे 卐 गायकवाड मंगल परिणय सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/8/2026 :
सौ.स्वाती अविनाश धाईंजे आणि श्री अविनाश तुकाराम धाईंजे राहणार व्यंकटनगर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची कन्या उपासिका दिव्या आणि सौ. महादेवी जयकुमार गायकवाड आणि श्री जयकुमार भागवत गायकवाड राहणार अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचा मुलगा उपासक सुरज यांचा मंगल परिणय सोहळा शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी स्वामी समर्थ मंगल कार्यालय पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे अत्यंत थाटाने संपन्न झाला. बौद्धाचार्य पत्रकार नागेश लोंढे यांनी या मंगल परिणय सोहळ्याचे सर्व विधी पार पाडले.
या सोहळ्याप्रसंगी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, वंचित बहुजन आघाडी अकलूज शहराध्यक्ष सुनील ज्ञानेश्वर कांबळे यांचे सह सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू-वरास शुभेच्छा दिल्या.
धाईंजे आणि गायकवाड परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला.

0 टिप्पण्या