सदाशिवनगर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा 731 वा समाधी सोहळा भव्यतेने साजरा

 

सदाशिवनगर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा 731 वा समाधी सोहळा भव्यतेने साजरा  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/8/2026 :

 सदाशिवनगर  येथील श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज प्रतिष्ठान व महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत सावता माळी महाराज यांचा 731 वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात राऊत वस्ती येथे संपन्न झाला. प्रतिष्ठानच्या वतीने गेली 21 वर्ष अरण येथून  ज्योत सदाशिवनगर  पर्यंत आणली जाते. सावता माळी यांच्या मंदिरा मध्ये सौ वसेकर  यांच्या शुभहस्ते ज्योत प्रचलित करण्यात आली. प्रतिष्ठांनचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ज्योत आणण्यासाठी दरवर्षी अरण या ठिकाणी जात  असतात. सकाळी 11:00 वाजता ज्योत अरण येथून निघुन टेंभुर्णी, माळीनगर, अकलूज, माळशिरस मार्गे सदाशिवनगर ला 5:00 वाजता पोहचली. सदाशिवनगर मध्ये  ज्योती चे जंगी स्वागत दिपक मोहिते व  परिवार, रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक  अनंतलाल  रतनचंद दोशी, सदाशिवनगर चे  सरपंच विरकुमार अनंतलाल दोशी व दोशी परिवार, अरविंद नाळे व परिवार, ग्रामस्थ इत्यादींच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

  रात्री मंदिर समोर भजनी मंडळ यांनी जागर करून भजन सादर केले व दुसऱ्या दिवशी सकाळी सावता महाराज यांच्या मूर्तीला श्री व सौ पिसे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. दुपारी काल्याचे किर्तन ह.भ.प.गोरख कुंभार महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यामध्ये संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या जन्मापासून ते समाधी पर्यंत त्यांचा जीवन काळ कसा गेला व त्यांनी त्यांच्या जीवनात एकदाही पंढरपूरला न जाता पांडुरंगाची भक्ती कशा पद्धतीने केली सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूर या ठिकाणी जातात परंतु पांडुरंगाची पालखी आज ही आरण या ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना भेटण्यासाठी दरवर्षी न चुकता जाते.आपले कर्म चांगले करत राहा, भुकेल्यांना व गरजू लोकांना मदत करा. आपल्या आई-वडिलांची सेवा करा, देवावर श्रद्धा ठेवा व त्याची मनोभावे भक्ती करा. तो तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला. 12 वाजता फुलांचा कार्यक्रम होऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. 




 सदर कार्यक्रमास  माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान जि.प.सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील,रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी,सदाशिवनगर ग्रामपंचायत सरपंच  विरकुमार अनंतलाल दोशी, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले सदाशिवनगर चे माजी उपसरपंच उदय धाईंजे व भामाताई भोंगळे,शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, सदाशिवनगर गावचे पोलीस पाटील आप्पासाहेब लोंढे, अध्यक्ष आबा काळे,अशोक पिसे, अजितकुमार दोशी, बबन गोफणे,नवनाथ सरवदे,भुजबळ ,कोरटकर,दशरथ बनकर  चंद्रकांत तोरणे, तात्या सालगुडे,  विक्रम पालवे, गजानन सुळे, राहुल पालवे, गणेश सुळे, प्रशांत जाधव,  तुकाराम जाधव,भीमराव शेंडगे,संतोष राजमाने, सौ पार्वती जाधव व सौ सुकेशनी शिंदे तसेच सदाशिवनगर व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.   प्रतिष्ठान च्या वतीने  सर्वांचे आभार अध्यक्ष ज्ञानेश राऊत यांनी मानले. सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या  पार पडण्यासाठी संत शिरोमणी सावता माळी महाराज प्रतिष्ठानचे सर्व  पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या