✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक1/8/2026 :
स्वत:चे मुल्यमापन करणारे नेहमी प्रसन्न व आनंदी असतात. जे इतरांचे मुल्यमापन करतात ते कायम चिंताग्रस्त, दुख्खी असतात.
शांत राहणे ही साधना आणि विचारपूर्वक बोलणे ही कला आहे. आयुष्यातील त्रास विसरून त्यातून मिळालेला धडा लक्षात ठेवणे महत्त्वाचे,
माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली नाती,
अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वास चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला किड लागते. म्हणून अभिमान जरूर बाळगावा. पण कोणत्याही गोष्टींचा गर्व होऊ देऊ नये,
जीवन सुंदर होण्यासाठी सर्व काही परिपूर्ण असण्याची गरज नसते. फक्त मन समाधनि आणि विचार सकारात्मक असले की प्रत्येक दिवस सुंदर वाटतो,
शेवटी आपण सगळेच या जगात आठवणी बनून उरणार आहोत. मग जगताना इतकं चांगलं जगायला हवं की आपल्या आठवणी कोणाच्या डोळ्यात अश्रू नाही तर ओठांवर हसू आणतील. आपण किती कमवल, किती मिळवलं यापेक्षा आपणं कसं वागलो, कोणाशी कसं बोललो हेच लक्षात राहणार आहे. शब्द विसरले जातात पण भावनांची छाप कायम राहते,
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
संकलन : प्रविण सरवदे, कराड,

0 टिप्पण्या