वननिवासींच्या पिकांच्या नासाडी करणाऱ्या दोषी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत; यशवंत क्रांती ची मागणी

 


वननिवासींच्या पिकांच्या नासाडी करणाऱ्या दोषी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत; यशवंत क्रांती ची मागणी

वृत्त एकसत्ता न्यूज

गारगोटी, प्रतिनिधी दि. २६ जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा व भुदरगड तालुक्यातील मेघोली धनगरवाडा येथे पारंपरिक वननिवासी धनगर बांधवांच्या उभ्या पिकांची वन विभागाकडून कथित बेकायदेशीर नासाडी करून वनहक्काची पायमल्ली केल्या प्रकरणी दोषी वन कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशा मागणीचे

 निवेदन यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथे  भेट घेऊन दिले.

    यावेळी  संजय वाघमोडे यांनी पालकमंत्र्यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत, पारंपरिक वननिवासींच्या उभ्या पिकांची कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता नासाडी करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच अनेक गरीब, अशिक्षित वननिवासींचे वनहक्क दावे अद्याप प्रलंबित असून, त्यांना न्याय देण्याऐवजी वन विभागाकडून दडपशाही केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी दोषी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS), वनहक्क कायदा आणि लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी आणि सर्व प्रलंबित वनहक्क दावे विशेष मोहिमेद्वारे दाखल करून घेण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

पालकमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याबरोबर बैठक घेऊन  योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

   शिष्टमंडळात धुळु मालु यमकर, लक्ष्मण धोंडीबा गावडे, देवबा विठ्ठल कस्तुरे, विठ्ठल धुळू अडुळकर, बिरू बाबू कस्तुरे, रमेश धुळु आडूळकर गंगाराम धोंडीबा गावडे, धुळाप्पा सोनबा गावडे, रमेश सोनबा गावडे, जानबा धोंडीबा गावडे, नागेश विठोबा बिचुकले, झिमदेव विठोबा बिचुकले, विठ्ठल बाबू कस्तुरे, भागोजी सयाजी गुंडरे, बाबू सयाजी गुंडरे, जानबा बाबू गावडे, जानू  धोंडीबा गावडे, विठ्ठल सिद्धू थोरवत, तानाजी बाबू कस्तुरे, नवलू बाबू कस्तुरे, रमेश बाबू कस्तुरे , रमेश नवलू कस्तुरे, देवबा भागोजी कस्तुरे, कोंडीबा सिधू  मलगोंडा, जनू बाबू गावडे,  कोंडीबा गंगाराम कात्रूट, श्रावण बाबू पटकरे, बाबू तातोबा पटकारे, मानू तातोबा पटकारे, बाबू बिरू पटकरे, सगू  जनू कात्रूट सुनील सगू कात्रूट, विठ्ठल नवलू येडगे, भागोजी लक्ष्मण मलगोडा, लक्ष्मण विठू मलगोडा, राजेंद्र बिरू बोडके, धोंडीराम सिद्धू मलगोडा, भागोजी बोडके, रामचंद्र विठोबा पिंगळे, अरुण बाबूजी फोंडे, बयाजी वरक, इत्यादींचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या