🔵 विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष 🟣 दिल्ली येथील आंदोलनात

 


🔵 विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष

🟣 दिल्ली येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 26/7/2026 : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे वृत्त येताच येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी ने पुकारलेल्या बंद मध्ये अकलूजकरांनी सहभाग नोंदवला होता यावेळी समस्त माळशिरस तालुका व अकलूज शहरातील आंबेडकर प्रेमी जनतेने भव्य मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबर सयाजीराजे मित्र मंडळाने  मोर्चा काढून पोलीस प्रशासनास निवेदन दिले होते. 

 दिल्ली येथील आंदोलनास अकलूज व परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी पाठिंबा दर्शवत शिक्षणमंत्र्याच्या राजीनामाची मागणी केली होती. केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनामाचे वृत्त येताच सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतषबाजी करीत व पेढे वाटत विजयोस्तव साजरा केला.

🟡दिल्ली येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान

यावेळी  नवी दिल्ली येथील जंतरमंतर वर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या वैष्णवी खिलारे व तनुजा साळुंखे, लखन बेंद्रे, समाधान वजाळे यांचा फेटा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या