मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 8/8/2026 :

अनेकदा आपल्याबद्दल कोणी वाईट बोलले, कोणी वाईट कृती केली किंवा आपल्याअपरोक्ष कोणाचे कान भरले, तर आपल्याला वाईट वाटते व त्या व्यक्तीचा खूप राग येतो.

अशा वेळेस आपली मानसिकता बिघडते आणि आपण खूप विचलित होतो. कशात लक्ष लागत नाही; डोक्यात सारखे तेच विचार येतात... ती व्यक्ती अशी का वागली? अशी का बोलली? आणि याच व्यर्थ विचारांत आपला अमूल्य वर्तमानकाळ निघून जातो.

जी व्यक्ती वाईट बोलते, ती बोलून मोकळी होते आणि त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा मात्र आपण स्वतःला त्रास देऊन भोगत असतो. तो त्यांचा स्वभाव व त्यांची वृत्ती आहे; मग आपण ते मनाला का लावून घ्यायचे?

आजचा संकल्प

आपल्या मनाला न पटणारे कोणी काही बोलले किंवा चुकीचे वागले, तर ते त्यांचे कर्म आहे. त्याचा विचार करून आपली मनःस्थिती न बिघडू देता आपण आपले चांगले कर्म करत राहू._

सौ. स्नेहलता स. जगताप.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या