✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/8/2026 :

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका.

कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात.

काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता. त्यात सर्वोच्चस्थानी पोहोचा.

जो स्वतःसाठी जगला, त्याचे अस्तित्व त्याच्याबरोबरच निघून जाते. परंतु जो दुसऱ्यासाठी जगला, त्याचे अस्तित्व त्याच्याबरोबर न जाता कायम इतरांच्या मनात घर करून अस्तित्वात राहते.

स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी माणसं किती आहेत ही मोजण्याची गरज नाही. परंतु दुसऱ्याची गरज आणि इच्छा पूर्ण करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारी माणसं कुठेच दिसत नाहीत.

जीवनाची वाटचाल करत असतांना, ठेच लागल्यावर एक गोष्ट शिकायला मिळाली की रस्ता कसाही असो, विश्वास आपल्या पावलावरच ठेवला पाहिजे.

खरं तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो. पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिले पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल, पण माणसे कधी बदलतील हे कधीच सांगता येत नाही.

शब्दा शब्दांनीच शिकवलंय पडता पडता सावरायला शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला शब्दां मुळेच होतो कधी एखाद्याचा घात आणि शब्दां मुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ शब्दां मुळेच जुळतात मना मनांच्या तारा आणि शब्दां मुळेच कधी चढतो एखाद्याचा पारा शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दां मुळेच कधी तरळते डोळ्यांत पाणी म्हणूनच जो जीभ जिंकतो तो मन जिंकतो आणि जो मन जिंकतो तो जग जिंकतो,

✍️ प्रा. एस. एम. पाटील 

 देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

✒️संकलन : प्रविण सरवदे