विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/8/2026 :
बोलताना शब्दांचे पोकळ फुगे हवेत सोडणे, वायफळ बडबड करणे, वाह्यातपणा करणे, टोचून बोलणे आणि सतत टोमणे मारणे या वाईट गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत. केवळ बढाई मारणे किंवा थापा मारणे यामुळे लोक आपली खरी किंमत ओळखतात.
थोडेच बोलावे; पण संकटात मनाला आधार देणारे शब्द ऐकणाऱ्याला मोठा मानसिक दिलासा देतात. आपले बोलणे नेहमी सकारात्मक व आश्वासक असावे. रागाच्या भरात उच्चारलेले संतापजनक शब्द केवळ मानसिक अशांतताच पसरवतात.
मुलांनो, आपले मन शांत असेल, विचार सकारात्मक असतील, स्वभावात नम्रता व विनयशीलता असेल, समोरच्याबद्दल आदर आणि मनात संवेदनशीलता असेल, तर आपल्याकडून नेहमीच सुंदर सुसंवाद साधला जाईल.
यामुळे आपली स्वतःची आणि समोरच्या व्यक्तीचीही मानसिक शांतता व प्रसन्नता कायम टिकून राहते.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या