विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 8/8/2026 :

आपल्या आसपास, नात्यांत किंवा गावात जरा श्रीमंत माणसे पाहिली की त्यांच्याबद्दल थोडे कुतूहल वाटते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक वाटते, नवलाई वाटते. भविष्यात आपणही तसेच पैसेवाले बनावे, असे स्वप्न आपण पाहतो.

श्रीमंतांकडील महागड्या वस्तू, कपडे आणि दागिने पाहून आपल्याकडेही ते सर्व असावे असे वाटणे साहजिक आहे; चार माणसांत मोठा मान मिळावा असेही वाटते.

मुलांनो, ही पैशाची व वस्तूंची श्रीमंती कायमस्वरूपी नसते. मात्र संस्कारांची श्रीमंती असेल, तर ती शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहते. कितीही वाटली तरी कधीच संपत नाही, तीच खरी श्रीमंती!

शालेय जीवनात सद्विचार व सदाचाराची संगत करा, हीच तुमची आयुष्यभराची खरी श्रीमंती ठरेल.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या