विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/8/2026 :
शालेय जीवनात आपल्याकडे स्वतःचे पैसे नसतात. आपल्याला काहीही खरेदी करायची असेल, तर आपण पूर्णपणे आपल्या पालकांच्या कमाईवर अवलंबून असतो.
कधी कधी आपल्या पालकांकडेही पुरेसे पैसे नसतात; अशा वेळी आपला खिसाही रिकामाच राहतो. या रिकाम्या खिशाचे आपल्याला अनेकदा वाईट वाटते.
मुलांनो, त्यापेक्षाही जास्त वाईट तेव्हा वाटले पाहिजे, जेव्हा आपला 'वरचा मजला' रिकामा असतो; म्हणजेच आपल्या डोक्यात ज्ञानाची व बुद्धीची कमतरता असते. या गोष्टीचे इतरांपेक्षा आपल्याला स्वतःला जास्त वाईट वाटले पाहिजे. बुद्धिमत्ता जितकी तल्लख, तितकीच आपली खरी वैचारिक श्रीमंती जास्त मानली जाते.
म्हणूनच तल्लख मेंदू, उत्तम बुद्धिमत्ता व चांगली स्मरणशक्ती हीच तुमची आयुष्यभराची खरी श्रीमंती आहे!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या