विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/8/2026 :
आपल्याला जेव्हा "तुमचे आदर्श कोण?" असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा आपण नेहमी काही मोठ्या नेत्यांची, विचारवंतांची, समाजसुधारकांची किंवा शास्त्रज्ञांची नावे आठवतो.
खरे तर सर्वप्रथम प्रत्येक गोष्ट आपण ज्यांच्याकडून शिकतो, ज्यांच्याकडे पाहत-पाहत आपण लहानाचे मोठे होतो, ज्यांचे अनुकरण करतो आणि ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, ते आपले जन्मदाते आई-वडील हेच आपले खरे आदर्श असतात.
मुलांनो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची प्रत्येक कृती आपण प्रत्यक्ष अनुभवत असतो. अपार कष्ट, त्याग, जिद्द, प्रेम, आपुलकी, सातत्य, माणुसकी, काटकसर व बचत अशा अनेक गोष्टींचे धडे ज्यांच्याकडून आपल्याला मिळतात, तेच आपले खरे प्रेरणास्थान असतात.
आई-वडिलांचे संस्कारच आपल्याला घडवतात; म्हणूनच तेच आपले खरे आदर्श आहेत!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या