मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/8/2026 :

दैनंदिन जीवनात कुटुंबातील व्यक्ती असोत वा परिचयातील लोक, संवाद हे होतातच; क्वचित प्रसंगी किरकोळ वादही होतात. अशा वेळी जास्त ताणून न धरता विषय सहजतेने सोडून दिला, तर मने कलुषित होत नाहीत. किती ताणायचे, की तो विषय तिथेच सोडून द्यायचा, हे सर्वस्वी आपल्याच हातात असते.

हीच गोष्ट काय आठवायचे आणि काय विसरायचे, यासाठीही अत्यंत महत्त्वाची ठरते. भूतकाळातील कटू आठवणी, कोणाशी झालेले वाद आणि कोणी केलेली निंदा आपण नेमकी आठवत बसतो. खरे तर या नकारात्मक गोष्टी विसरणे आणि मनाला निखळ आनंद देणारे चांगले प्रसंग आठवणेच अधिक योग्य ठरते.

आपली मानसिकता सदैव सकारात्मक राहील, मन आनंदी व प्रफुल्लित राहील, यासाठी आपल्या मनाला चांगल्या विचारांची सवय लावणे आपल्याच हाती असते.

आजचा संकल्प

आपल्या मनातील सकारात्मक विचारच आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करतात हे लक्षात ठेवू; स्वतःच स्वतःला उत्तम घडवू आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या