चांगल म्हणजे नक्की कसं.?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/8/2026 :
नोकरी करणाऱ्याला वाटत व्यवसाय बरा, व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरीच बरी,
एकत्र राहणाऱ्यांना वाटतं वेगळं राहणं चांगलं, वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्रच बरं होतं,
गावात राहणाऱ्याला वाटत शहरात मजा, शहरातला म्हणतो गावातल आयुष्य साधं, सरळ, सोप्प व खर्च कमी आहे,
केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान, कुरळे केसवाली म्हणते हा किती गुंता,
एक मुल असतं त्यांना वाटतं दोन असती तर, दोन असणाऱ्यांना वाटतं एक वाला मजेत,
मुलगी असली की, वाटतं मुलगा हवा होता, मुलगा असला की, वाटतं मुलीला माया असते. ज्याला मुल नसतं, तो म्हणतो काहीही चालेल,
नांवे ठेवणारे रामातही दोष बघतात, कौतुक करणारे रावणीचीही स्तुती करतात,
नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाहीं. त्यासाठी जे आहे ते स्वीकार करा, आणि आयुष्य आनंदात जगा,
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड,

0 टिप्पण्या