समर्थ इंजिनिअरिंग वर्क्सला सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/8/2026 :
समर्थ इंजिनिअरिंग वर्क्स चे कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज च्या गाळा नंबर 27 मध्ये स्थलांतर झाल्या निमित्त आयोजित श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. त्याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, रोहित गुलाबराव पिंपळकर, गणेश अर्जुन साळुंखे, वाजिद हरून सय्यद, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रोप्रायटर उदय गोरख इंगळे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि सन्मान केला.

0 टिप्पण्या