♈ तिरंगा ध्वजाचा आलेला कळवळा !


♈  तिरंगा ध्वजाचा आलेला कळवळा !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/8/2026 :

स्वातंत्र्यपूर्व काळात तिरंगा ध्वज फडकवणार त्याला पकडून देऊन ब्रिटिशांकडून बक्षीस मिळवणाऱ्यांच्या संघीय अवलादी आज 'घर घर तिरंगा' म्हणतांना तिरंग्याच्या सन्मानाकडे दुर्लक्ष करतात. 

सन १९२९ च्या डिसेंबर मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करून २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यासाठी तिरंगा ध्वज फडकविण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा संघाने त्यांचा ध्वज फडकवला. स्वातंत्र्यानंतर तब्बल ५५ वर्ष आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर भारताचा स्वाभिमान तिरंगा ध्वज फडकवला नाही. २६ जानेवारी २००१ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील रेशीम बागेत असलेल्या मुख्यालयात घुसून गणतंत्र दिनाच्या दिवशी बाबा मेंढे, रमेश कळंबे, दिलीप चटवानी या तीन युवकांनी तिरंगा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला.

याच संघाच्या मुख्यालयावर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी कधीच तिरंगा ध्वज फडकवला जात नव्हता. संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केल्यामुळे या तीन युवकावर संघाने खटला दाखल केला, जो खटला स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांकडून तिरंगा ध्वज फडकविल्यावर दाखल केला जात होता.

आरएसएस ची मुखपत्र ऑर्गनायझर च्या १४ ऑगस्ट १९४७ च्या अंकात म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच्या अंकात छापून आले की, जे लोक नशिबाने सत्य पर्यंत पोहोचले ते भलेही आमच्या हाती तिरंगा पकडून देवत, परंतु हिंदू कडून त्याला कधी सन्मान मिळणार नाही. तीन चा आकडा अशुभ आहे, आणि एक असा झेंडा ज्यात तीन रंग आहेत, अत्यंत खराब मनोवैज्ञानिक परिणाम करेल व तो देशासाठी नुकसानकारक असेल. " आजही भाजप आरएसएसच्या लोकांकडून तिरंग्याला सन्मान दिला जात नाही. 

संघ आणि भाजपवाल्यांच्या मनात तिरंग्या बद्दल कधीही श्रद्धा नाही. जनतेच्या रेट्यामुळे आज ते तिरंगा ध्वजाबद्दल पुळका दाखवत असले, तरी त्यांच्या मनात तिरंग्या बद्दल काडी मात्र प्रेम दिसत नाही, हे त्यांच्या कृतीतून दिसते. आज कितीही 'घर घर तिरंगा' करून तिरंग्या बद्दलच्या प्रेमाची आव आणण्याचा प्रयत्न केला, तो किती नाटकी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संघाने ब्रिटिशा विरुद्ध तिरंगा ध्वज हातात घेऊन का फडकवला नाही? आज ब्रिटिश नाहीत म्हणून त्यांना तिरंगा ध्वजाचा आलेला कळवळा हा नाटकी आहे. 

भाजपचा विद्यमान अध्यक्ष असेल देशाचा पंतप्रधान मोदी, यांनी अनेक वेळा तिरंगा ध्वज बद्दल सन्मानपूर्वक वागले नसल्याचे उदाहरण अनेक वेळा जनतेने पाहिलेली आहेत. आज भाजप आरएसएसने 'घर घर तिरंगा' ही

 अभियान राबवून स्वातंत्र्यपूर्व काळा ते स्वातंत्र्यानंतरचा तिरंग्या बद्दलचा संघाने केलेल्या कुकर्माचे पाप झाकण्यासाठी केलेले अभियान आहे, एवढंच म्हणावं लागेल.

हरिभाऊ सोळंखे

सादोळा, ता.माजलगाव, जि.बीड

🍁 🍁 🍁

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या