मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/8/2026 :
दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक अनुभव असे येतात की चूक काय आणि बरोबर काय, तेच समजत नाही. आपण चुकीच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहतो आणि निर्णय घेताना चुकतो.
आपल्या कुटुंबात, नात्यांत व मित्रमंडळीत कधी मतभेद होतात, वाद होतात; आपण भांडतो आणि एकमेकांना रडवतो. परत तोंड न पाहण्याचा टोकाचा निर्णय घेतो आणि अगदी साध्या कारणांवरून वैरभाव धरतो.
मात्र एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण खूप रडतो; त्या व्यक्तीशिवाय काही सुचत नाही, तिची सारखी आठवण येते आणि दुःख अनावर होते. पण तेव्हा या दुःखाचा काहीच उपयोग नसतो; कारण गेलेली व्यक्ती कधीही परत येणार नसते.
आजचा संकल्प
जिवंत असता लाथा देती, मेल्यानंतर खांदा!' ही समाजातील कटू वृत्ती दुरुस्त करण्याचा आपण मनापासून प्रयत्न करू. प्रत्येक व्यक्ती हयात आहे तोपर्यंतच तिला भरभरून प्रेम, माया, आदर देऊ आणि तिच्याशी आपुलकीने वागू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या