मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो

 

मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/8/2026 :

मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो. आज मनमाड स्टेशन पश्चिम भारतातील सर्वात महत्वाचे जंक्शन समजले जाते. ब्रिटिशांनी मात्र ह्या स्टेशनची निवड करताना येथील थंड हवामान बघितले होते. 

तीनशे वर्षांपूर्वी ह्याठिकाणी एक लहान खेडे होते. खेड्यात नारळाची (माड) हजारो झाडे होती. म्हणून ह्या खेड्याला मनमाडी असं नाव होतं. जवळच अनकाई टणकाई हे यादवकालीन किल्ले व लेण्या आहेत. यादवांच्या काळात उत्तरेकडे कान्हदेशात/खान्देशात जाण्यासाठीचा रस्ता ह्या दोन किल्ल्यांच्या मघोमध असलेल्या दरीतून जातो. दक्षिणेकडे पुण्याकडे जाणारा एकमेव मार्गही ह्याच दोन किल्ल्यांच्या मधात असलेल्या रस्त्यातून जातो. त्याच शेजारी "मनमाडी" नावाचे हे जुने खेडे होते. 

ब्रिटिशांनी त्यामुळे ह्याच पठाराची निवड रेल्वेचे जंक्शन निर्माण करताना केली. मुंबई ते मनमाड, मनमाड ते हैदराबाद, मनमाड ते आग्रा, मनमाड ते दौंड असे चार रेल्वेमार्ग एकाच स्टेशनला जोडण्यात आले आणि ह्या लहानश्या हिलस्टेशनची भरभराट सुरू झाली. ह्या स्टेशनला मनमाड असे नाव ब्रिटिशकाळी पडले. ह्याच काळात शेकडो पंजाबी लोकांनी मनमाड शहरात वास्तव्य केलं. भारतातील तिसरा सर्वात मोठा गुरुद्वारा गुपतसर इथे उभा आहे. ह्या पंजाबातील शीख बांधवांचे हजारो मराठी वंशज आजही मनमाडमध्ये पंजाबी-मराठी ही ओळख घेऊन राहतात. 

मोठ्या रेल्वेस्टेशनमुळे भारत सरकारने मनमाडमध्ये धान्य गोदाम तयार केले. हे त्याकाळात आशिया खंडातील सर्वात मोठे धान्य गोदाम होते. मनमाडजवळील थंब्सअप चा आकार असलेला डोंगर जगप्रसिद्ध आहे.  ह्या डोंगरावर अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे. स्थानिक ह्याला हडबीची शेंडी म्हणून ओळखतात. 

हे मनमाड शहर आज नाशिक जिल्ह्यातील चौथे सगळ्यात मोठे शहर म्हणून उदयास आले आहे.

*#मनमाड #जंक्शन #दुर्मिळफोटो*

MG

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या