🔰 तेव्हाच माणसं माणसात होती.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/8/2026 :
एक आजी नातवाला सांगत होती
काय असतात नाती-गोती
आईला मम्मीची उपमा नव्हती
बापाला पोर भित होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणस माणसात होती...
सर्व कुटुंब एकत्र होतं
त्यात कोण परकं नव्हतं
नेसायला फाटकं लुगडं होतं
अब्रू नि तेव्हा कोणी नागडं नव्हत
गरिबीने पण लाज धरली होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणस माणसात होती...
मैतिला पण माणस एकत्र येत होती
सुखदुःखाचा घास एकामेकात भरवत होती
माणसातला माणूस जाणत होती
शेवटचा का होईना घास पत्र्यावर टाकत होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणस माणसात होती....
पत्राने व्यवहार होत होता
मोबाईलचा तेव्हा कोणी वेडा नव्हता
टिक टॉक वर पोर झळकत नव्हती
सासरी जाताना अश्रू पुसत होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणसं माणसात होती...
संस्कृतीला माणस जपत होती
जात्यावर सुद्धा ओव्या गात होती
राजकारणाला गावात जागा नव्हती
देवळातली आरती तेव्हा एकत्र म्हणत होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणस माणसात होती...
गरिबीने जनता पीडित होती
एकामेकाची भूक जाणत होती
स्वार्थाची कोठेही लयलूट नव्हती
एकमेकांचं अश्रू तेव्हा पुसत होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणसं माणसात होती...
पैशाला कोणी मानत नव्हतं
सोन्या ला हि लुटत नव्हतं
माणसात माणसं राहत होती
पैशापेक्षा वचनाला जास्त जपत होती
खरं सांगू बाळा
तेव्हाच माणस माणसात होती....
✍️ संकलन : प्रविण सरवदे, कराड
संदर्भ : बोभाटा
▣✥⊰☬༒☬⊱✥▣
0 टिप्पण्या