मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/8/2026 :

सध्या आपण जातीपातीचे राजकारण याबद्दल बरेच काही बोलतो, ऐकतो, वाचतो आणि अनुभवतोसुद्धा. 'सर्वधर्मसमभाव' हा शब्द केवळ वापरण्यापुरताच उरला आहे का? प्रत्यक्ष व्यवहारात तो किती अनुभवला जातो?

जातीवाचक बोलायचे नाही हा केवळ नियम नव्हे, तर कायदा आहे; पण समाजपातळीवर हा नियम अनेकदा मोडला जातो. जात विचारल्याशिवाय कोणतेच कागदपत्र पुढे सरकत नाही. त्याचे फायदे-तोटे हा अजून एक वेगळाच विषय आहे.

पूर्वी उपजीविकेसाठी जो जे काम करायचा, त्यावरून जाती पडल्या असाव्यात. समाजात उच्च-नीच असा भेदभाव राहू नये म्हणून सर्वांना समान वागणूक मिळावी, हे संविधानाने स्पष्ट केले आहे; पण मनातील जात सहसा जात नाही आणि कागदावर जात असलीच पाहिजे हा अट्टाहासही कमी होत नाही.

आजचा संकल्प

दैनंदिन जीवनात आपले परस्परांतील संबंध जातीवर नव्हे, तर निखळ माणुसकीच्या नात्यावर आधारलेले ठेवू. माणसाला 'माणूस' समजू व एकमेकांशी माणसासारखेच वागू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या