विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/8/2026 :
श्रीमंत होणे तर सर्वांनाच आवडते; या वयात तर श्रीमंती हे मुलांसाठी खूप मोठे आकर्षण असते. भारी कपडे व महागडे बूट असावेत, छान छान महागड्या वस्तू आपल्याकडे असाव्यात असे वाटते. मोठे झाल्यावर आलिशान गाड्या आणि महागड्या मोबाईलचे स्वप्न आपण पाहतो.
खरे तर आपले सुदृढ आरोग्य व निष्कलंक चारित्र्य ही खरी श्रीमंती अगोदर कमावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चांगल्या सवयींचे पालन करणे खूप आवश्यक असते.
मुलांनो, जेव्हा आपले शरीर व मन निरोगी असते, तेव्हाच आपण जीवनातील इतर भौतिक गोष्टींचा खरा आनंद घेऊ शकतो. आपले आरोग्य, शिक्षण, उत्तम संस्कार, नैतिक वर्तन आणि सकारात्मक विचार हीच आपली आयुष्यभराची खरी संपत्ती असते.
म्हणूनच सद्विचार व सदाचार हीच खरी श्रीमंती मानूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या