"सहकार महर्षि" कारखान्याच्या वतीने एकरी १०० मे.टन ऊस उत्पादनाकरिता डॉ. संजीव माने यांचे चर्चासत्र संपन्न


 "सहकार महर्षि" कारखान्याच्या वतीने एकरी १०० मे.टन ऊस उत्पादनाकरिता डॉ. संजीव माने यांचे चर्चासत्र संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/8/2026 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि ., शंकरनगर अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) या साखर कारखान्याच्या वतीने आयोजीत केलेल्या एकरी १०० मे.टन ऊस उत्पादनाकरिता डॉ. संजीव माने यांचे चर्चासत्राचे  बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी कारखान्याचे उदय सभागृहात आयोजन केले होते. 

 सदर चर्चासत्रास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील, कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, व्हा.चेअरमन शंकरराव माने-देशमुख, तसेच कारखान्याचे आजी माजी संचालक , कारखान्याकडून राबविण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कार्यक्रमात सहभाग घेतलेले सभासद, तसेच कारखान्याचे विविध विभागीय कार्यालयाकडील प्रगतशील ऊस उत्पादक सभासद, कार्यकारी संचालक, सुहास यादव, शेतकी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       सदर कार्यक्रमांमध्ये डॉ.संजीव माने यांनी एकरी १०० मे.टन ऊस उत्पादनाकरिता काय उपाययोजना करावयाच्या याबाबत मार्गदर्शन केले,  त्याकरिता त्यांनी ऊस शेती करता पंचसूत्री कार्यक्रम आवश्यक असलेबाबत नमूद केले. त्यामध्ये जमिनीची सुपीकता, लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापन, व सेंद्रिय खतांच्या मात्रा, तसेच पीक संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.

       कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व  चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक सभासदांकरिता नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती सर्व सभासदांपर्यंत देऊन ऊस उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट असून सदर ऊस चर्चासत्र कार्यक्रमाचा फायदा सर्व ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणावरती होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या