भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज का येतो?; गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टने सांगितले कारण

 


भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज का येतो?; गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टने सांगितले कारण

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/8/2026 :

Stomach Growling Reasons : पचनसंस्थेतील अनेक प्रक्रियांमुळे पोटातून गुडगुड असा आवाज ऐकू येऊ शकतो. डॉक्टरांनी यातील काही प्रमुख कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे.

*Stomach Growling Reasons :* पोट रिकामी असताना किंवा भूक लागल्यावर पोटातून गुडगुड, असा आवाज येत असल्याचे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. असा आवाज येणे हा पचनक्रियेचा एक सामान्य भाग आहे आणि तसा आवाज केवळ भूक लागल्यावरच नव्हे, तर कधीही येऊ शकतो. अशा आवाजाला वैद्यकीय भाषेत ‘बोरबोरिग्मी’ (borborygmi) म्हणून ओळखले जाते. हा आवाज, पोट आणि आतड्यांमधून वायू, द्रव व पाचक घटकांच्या हालचालीमुळे येत असतो.

फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. निधी चौहान यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पचनक्रियेचे असे वेगवेगळे टप्पे असतात, ज्यादरम्यान पोटातून आवाज येऊ शकतात. हे आवाज सहसा निरुपद्रवी असले तरीही जर पोटातील अशा स्वरूपाच्या सततच्या आवाजांसह पचनाची इतर लक्षणेही दिसत असतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

*पोटातून गुडगुड असा आवाज का येतो?*

पचनसंस्थेतील अनेक प्रक्रियांमुळे पोटातून गुडगुड असा आवाज ऐकू येऊ शकतो. डॉक्टरांनी यातील काही प्रमुख कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे.

- *१) आतड्यांची अंतर्गत स्वच्छता –* पोट रिकामे झाल्यानंतर सुमार ९० ते १२० मिनिटांनी, पचनसंस्था मायग्रेटिंग मोटर काॅप्लेक्स ( MMC) सक्रिय करु शकते. होणाऱ्या आकुंचन क्रियेमुळे अन्नाचे कण, जीवाणू आणि मृत पेशी पचनमार्गातून पुढे ढकलल्या जातात. त्या परिस्थितीत पोटाचा आकार लहान झाल्यामुळे, हवा आणि द्रवपदार्थांमुळे आवाज निर्माण होतात, ज्यामुळे भुकेशी संबंधित विशिष्ट स्वरुपाचे आवाज ऐकू येतात. 

- *२) पचनक्रिया -* जेवणानंतरही पोटातून आवाज येत राहिल्यास, ती क्रिया बहुधा पेरिस्टॅलिसिस नावाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होते, ज्यात पचनमार्गातून अन्न सतत घुसळले जाऊन पूढे ढकलले जाते. जेव्हा जड पदार्थ, पचणारे अन्न आणि हवा आतड्यांमधून पुढे जाते. तेव्हा गुडगुड आवाज येऊ शकतात. म्हणून जेवणानंतर अशा स्वरुपाचे आवाज ऐकू येणे हे चिंतेचे कारण असेलच, असे नाही. 

- *३) गिळलेली हवा आणि गॅस -* दिवसभरात गिळलेल्या हवेच्या प्रमाणाचाही पोटाच्या आवाजावर परिणाम होऊ शकतो. घाईघाईने जेवल्याने, च्युईंगम चघळल्याने किंवा स्ट्राॅने पाणी प्यायल्याने व्यक्तीकडून जास्त हवा गिळली जाऊ शकते. आतड्यातील जीवाणूंमुळे कर्बोदकांचे नैसर्गिकरित्या किण्वन होऊनही वायू तयार होतो. जेव्हा या वायूचे बुडबुडे आतड्यातून पुढे जाऊ लागतात, तेव्हा पोटातून अधिक तीव्रतेने आवाज ऐकू येऊ शकतात. 

- *४) तणाव -* तणावामुळे आतड्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. पचनसंस्था आणि मेंदू एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याला gut-brain axis असे म्हणतात. डॉ. चौहान यांच्या मते तणाव आणि चिंता आतड्यांची क्रियाशीलता वाढवून पचनक्रियेला गती देऊ शकणार. त्यामुळे पोटात होणारा गुडगुड आणि इतर आवाज वाढू शकतात. 

*डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?*

बहुतेक प्रकरणांमध्ये, पोटात गुडगुड हा सामान्य पचन प्रक्रियेचा एक भाग असतो; पण जर पोटात सतत गुडगुड होत असेल आणि तीव्र पोटदुखी, सतत पोट फुगणे, मळमळ किंवा शौचाच्या सवयीमध्ये बदल यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कधी कधी ही लक्षणे पचनसंस्थेतील एखाद्या समस्येचे संकेत देऊ शकतात, जसे की पोषक तत्वांचे अपुरे शोषण किंवा आतड्यांच्या हालचालीतील अडथळा.‌

संकलन : यशवंत वाघ

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या