विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/8/2026 :

अनेकदा आपण आपल्या मित्रांबरोबर थोडे मतभेद झाले म्हणून अबोला धरतो. अमुक एक व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही म्हणून आपण तिच्याशी बोलणे बंद करतो; पण असे आपण किती जणांना दूर ठेवणार?

खरे तर प्रत्येकाने आपल्याच मनासारखे वागावे ही अवाजवी अपेक्षा करणे चुकीचे आहे. "मी समोरच्याला बदलूनच दाखवीन" ही प्रतिज्ञाही चुकीची आहे; कारण प्रत्येक जण आपापल्या बुद्धी व संस्कारांनुसार कर्म करत असतो. इतरांना बदलवणारे आपण कोण?

 रामायण-महाभारतापासून याची अनेक उदाहरणे आहेत. रामाने सांगूनही लक्ष्मण कुटीपासून दूर गेला, लक्ष्मणाने सांगूनही सीतेने लक्ष्मणरेषा ओलांडली आणि पुढील मोठे रामायण घडले.

म्हणूनच कोणालाही दोष न देता, घडलेल्या प्रसंगांतून समजूतदारपणे योग्य मार्ग काढणे हेच नेहमी आपल्या हातात असते.

 सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या