विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/8/2026 :
लहानपण हे कितीही सुंदर असले, तरी कधी कधी आपल्याला हे लहानपण नकोसे वाटते. घरातील मोठी माणसे आणि शाळेतील शिक्षक यांच्या सततच्या सूचना नकोशा वाटतात; तर वेळप्रसंगी बसणारा ओरडा किंवा शिक्षा तर नकोच असते.
अनेकदा बालमनात प्रश्न पडतात की, या मोठ्या लोकांना आपल्यातल्या नेमक्या चुकाच कशा दिसतात? आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांना अयोग्य का वाटतात? प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीत ते आपल्याला का टोकतात?
मुलांनो, लहानपणी पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः मोठे झाल्यावर प्रत्यक्ष कृतीतून देऊ शकता. मुलांमधील केवळ चुका काढण्याऐवजी त्यांना प्रेमळपणे समजावून सांगू शकता. बालमनाला होणाऱ्या यातनांची जाणीव ठेवून मोठे झाल्यावर लहानांशी नेहमी आपुलकीने वागा.
मोठ्या माणसांनी आपल्याशी ज्या प्रेमळपणे वागावे असे वाटते, तसेच आपणही सर्वांशी वागण्याचा प्रयत्न करू!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या