🔰 १२ व १३ डिसेंबर रोजी १२ वे आंबाजोगाई साहित्य संमेलन होणार 🟣 संभाजीनगर येथील आंबाजोगाईकरांचा निर्धार

 


🔰 १२ व १३ डिसेंबर रोजी 

१२ वे आंबाजोगाई साहित्य संमेलन होणार

🟣 संभाजीनगर येथील आंबाजोगाईकरांचा निर्धार

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/8/2026 :

12 व 13 डिसेंबर 26 शनिवार व रविवार रोजी १२ वे आंबाजोगाई साहित्य संमेलन संभाजीनगर येथील एम. आय. टी. परिसर, बीड बायपास रोड, संभाजीनगर या ठिकाणी भव्य स्वरूपात करण्याचा निर्णय 16 ऑगस्ट रोजी झालेल्या स्वागत सभासदांच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे होत्या.

*वृक्षारोपणाने नांदी*

एम. आय. टी. परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून संमेलनाची नांदी केली जाईल. अंबाजोगाईच्या लेखकांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ दुतर्फा लावले जाणार आहेत. शिवाय सेल्फी सेंटर हॆ या संमेलनाचे मुख्य आकर्षण असेल.

*दोन कवी संमेलन*

या संमेलनात एक निमंत्रितांचे व एक खुले कविसंमेलन होईल. संमेलन अध्यक्ष इंदुताई जोंधळे यांची मुलाखत घेण्यात येईल. तसेच आंबाजोगाई काल, आज आणि उद्या या विषयावर आगळा वेगळा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. उदघाट्न व समारोप सत्रात मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

*सांस्कृतिक कार्यक्रमाचे वेगळेपण-*

सांस्कृतिक कार्यक्रमात आंबाजोगाईच्या दिग्गज व उदयोन्मुख कलावंतांच्या प्रतिभेची झलक पहायला मिळेल. संभाजीनगर येथे राहणाऱ्या मुलांना रॅप, स्टॅन्डअप कॉमेडी अशा विविध प्रकारच्या आधुनिक कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

*नव्या जुन्यांचे चित्र प्रदर्शन*

या साहित्य संमेलनात चित्र परदर्शन भरवले जाणार, यात आंबाजोगाईच्या कलावंतांच्या महत्वपूर्ण कलाकृती बरोबरच मुला-मुलींनी काढलेली नव्या पिढीची चित्रेही मांडली जाणार आहेत. जुन्या पिढीची थेट चित्रे न मिळाल्यास त्याची प्रत मांदण्यात येईल. बालकाना चित्राच्या विषयांचे कोणतेही बंधन नाही. आंबाजोगाईचा भोवताल व्यक्त करणाऱ्या फोटोचा (छायाचित्रांचा) यां प्रदर्शनात एक वेगळा भाग केला जकणार आहे.

*गावाबद्दल स्मरणिका*

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. स्मरणिकेत आंबाजोगाईच्या आठवणी असतील. मान्यवर लेखक तर लिहितीलच पण सामान्यपणे न लिहिणाऱ्या लोकांच्या आठवणीना प्राधान्य दिले जाणार आहे. कोठेही असलेल्या आंबाजोगाईकरांनी त्यासाठी आठवणी लिहून पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.

*दोन दिवंगतांची नावे*

 संभाजीनगर येथे येऊन मोठे नाव कमवलेल्या आंबाजोगाईच्या दोन दिवंगत सुपुत्रांची नावे साहित्य नगरी व सभामंचाला देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे व जेष्ठ नाट्यकर्मी डॉ. चंदू सोमण या दोन सुपुत्रांची आठवण हॆ संमेलन ज्वलंत ठेवणार आहे.


*उत्स्फूर्त प्रतिसाद-*

गाव केवळ भूगोलात नसते तर ते त्यागावात राहून गेलेल्यांच्या मनात वसते, ही संकल्पना अमर हबीब यांनी मांडली. संभाजीनगर येथे राहणाऱ्या आंबाजोगाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्याची प्रचिती दिली. शकुंतला लोमटे यांनी हॆ संमेलन बियाणे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. स्वागत समितीचे सचिव गोरख शेंद्रे, डॉ. राहुल धाकडे (अध्यक्ष, मसाप), डॉ शैलजा बरुरे (उपाध्यक्ष, मसाप), डॉ रत्नाकर देशपांडे, दासू वैद्य, प्रभाकर आगळे, डॉ. दिलीप घारे, सुनील काळदाते, सुलभा खंदारे, डॉ शिरीष खेडगीकर, सुरेंद्र पाटील, गोविंद हुंबे, पिंपळकर, विलास इंगळे, बलराज संघई, अश्विनी चौधरी, वरदाताई सोमण, डॉ अल्का खेडगीकर, ज्योती संभूस, मनीषा फडके, अरुण थोरात, आदी अनेक मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या