रु.२३० कोटी पाण्यात

 


रु.२३० कोटी पाण्यात

माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/8/2026 :

 महाराष्ट्र सरकारच्या मुकूटात अजून एक मानाचं मोरपंख रोवलं गेलंय. 

मेट्रो-7 साठी मुंबई विमानतळाजवळ २३० कोटी खर्चून पूल बांधला. विमानतळाजवळ असल्यानं उंचीची मर्यादा आहे. ते लक्षातच आलं नाही! पूल मर्यादेच्या शेवटच्या उंचीवर बांधला आणि लक्षात आलं की ओव्हरहेड वायरची उंचीच गृहीत न धरल्यानं तो पूल विमानतळ प्राधिकरणाची मंजूरी मिळवू शकत नाही! बांधकाम वाया गेलं. आता तो पूल पाडून नवं टेंडर! नवं टेंडर, नवी मज्जा! 

जनतेच्या टॅक्समधून जमा केलेले २३० कोटी पाण्यात. पूल पाडायला काही कोटी अजून जातील, तेही पैसे पाण्यात. राजकारण्यांना कुठे आपल्या खिशातून पैसे टाकायचेत? 

होऊ द्या खर्च.

वाहू द्या पैसा. 💶💶

पंकज कालुवाला 

💸💸

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या