🔰 सकाळी उठताच सतत शिंका येतात? कारण सर्दी नाही, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते मॉर्निंग ॲलर्जी
🟢सकाळी उठल्यावर सतत शिंका येतात? हे सर्दी नसून डस्ट माइट्स किंवा मॉर्निंग ॲलर्जी असू शकते.
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/8/2026 :
Morning Allergy Symptoms:* सकाळी उठल्यावर सलग शिंका येणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, घशात खवखव जाणवणे, डोळ्यांना खाज सुटणे आणि डोळ्यांतून पाणी येणे, ही लक्षणे अनेकांना नेहमीची वाटतात. अनेकदा याला वातावरणातील बदल किंवा सर्दी-जुकाम समजले जाते. मात्र ही लक्षणे दररोज सकाळी उठल्यानंतरच अधिक जाणवत असतील, तर त्यामागे मॉर्निंग ॲलर्जी असण्याची शक्यता असू शकते. बेडरूममध्ये असलेली धूळ, डस्ट माइट्स, बुरशी आणि पाळीव प्राण्यांशी संबंधित ॲलर्जेन्स यांचा रात्रीच्या वेळी बराच वेळ संपर्क येतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ॲलर्जीची लक्षणे अधिक तीव्र जाणवू शकतात.
*सकाळी उठल्यावरच ॲलर्जी का वाढते?*
रात्री आपण साधारण ६ ते ८ तास एकाच बेडवर झोपतो. या काळात गादी, उशी, चादर आणि ब्लँकेटमध्ये असलेल्या धूळकण किंवा डस्ट माइट्सच्या संपर्कात शरीर दीर्घकाळ राहते. या ॲलर्जेन्सच्या संपर्कानंतर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा प्रतिक्रिया देते. त्यामुळे हिस्टामिनसारखी रसायने सक्रिय होऊन शिंका, नाक वाहणे, नाक बंद होणे, घशात खवखव आणि डोळ्यांना खाज यांसारखी लक्षणे दिसू शकतात. काही ठिकाणी सकाळच्या वेळेत परागकणांचे प्रमाणही जास्त असू शकते. त्यामुळे खिडकी उघडी ठेवून झोपणाऱ्या किंवा सकाळी लवकर बाहेर फिरायला जाणाऱ्या व्यक्तींमध्येही ही समस्या वाढू शकते.
*बेडरुममध्ये दडलेले हे ३ ॲलर्जी ट्रिगर ठरु शकतात*
*१. डस्ट माइट्स*
डस्ट माइट्स हे अतिशय सूक्ष्म जीव असून ते गाद्या, उशा, रजया, ब्लॅंकेट आणि कार्पेटमध्ये आढळू शकतात. उबदार आणि दमट वातावरण त्यांना पोषक ठरते. त्यांचें मलमूत्र आणि शरीराचे सूक्ष्म कण हवेत मिसळल्यानंतर श्वासावाटे शरीरात गेल्यास काही व्यक्तींमध्ये ॲलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठताच शिंका येण्यामागे बेडिंगमधील डस्ट माइट्स हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.
*२. मोल्ड किंवा बुरशी*
घरातील एखाद्या भागात सतत ओलावा किंवा सीलन असेल, तर बुरशी वाढवण्याची शक्यता असते. एसी, कूलर, भिंती, बाथरूम किंवा दमट कोपऱ्यांमध्येही मोल्ड वाढू शकतो. बुरशीचे सूक्ष्म बीजाणू हवेत मिसळून श्वासांना के शरीरात गेल्यास काही व्यक्तींमध्ये ॲलर्जीची लक्षणें वाढू शकतात. काही लोकांमध्ये यामुळे दम्याची लक्षणेही बळावू शकतात.
*पोरं म्हणजेच परागकण*
झाडे, गवत आणि काही वनस्पतींमधून हवेत पसरणारे परागकण हेही ॲलर्जी चे कारण ठरु शकतात. सकाळी खिडकी उघडी ठेवणे किंवा प्राजक्ताचे प्रमाण जास्त असताना बाहेर जाणे यामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये शिंका, नाक वाहणे आणि डोळ्यांना खाज येणे वाढू शकते.
*डस्ट माइट्स, मोल्ड आणि पोलनमध्ये फरक काय?*
- डस्ट माइट्स हे गादी, उशी, कार्पेट, ब्लॅंकेटवर आढळतात. यामुळे त्रास होत असेल तर सकाळी उठल्यानंतर शिंका येतात.
- पोरं हे झाडे, गवत, फुले यावर आढळणे. सकाळी किंवा वाऱ्याच्या वेळी ते पसरु शकते.
- मोल्ड हे ओलसर, सीलन असलेल्या जागी आढळते. त्यामुळे दमट, पावसाची वातावरणात लक्षणे आणखी तीव्र दिसून येतात.
लक्षणें अनेकदा सारखी दिसत असली तरी त्यामागील कारण वेगवेगळे असू शकते. त्यामुळे ॲलर्जीचा ट्रिगल ओळखणे महत्वाचे आहे.
*माॅर्निंग ॲलर्जी कमी करण्यासाठी काय कराल?*
बेडरुमची स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.
- उशीचे कव्हर, चादर आणि ब्लॅंकेट नियमितपणे धुवा.
- शक्य असल्यास बेडिंग गरम पाण्यात दुखण्याची सवय लावा.
- गादी आणि उशीवरील धूळ नियमितपणे साफ करा.
- घरातील आणि विशेषतः बेडरुममधील ओलावा नियंत्रित ठेवा.
- एसी, कूलर आणि एअर फिल्टरची नियमित स्वच्छता करा.
- घरात बुरशी किंवा सीलन दिसल्यास त्यांकडे दुर्लक्ष करू नका.
- ॲलर्जीचा त्रास होत असल्यास प्राजक्ताचे प्रमाण जास्त असताना खिडक्या उघड्या ठेवणे टाळा.
- पाळीव प्राणी असल्यास त्यांना बेडवर झोपू देणे टाळणे काही व्यक्तींना फायदेशीर ठरु शकते.
- बाहेरून आल्यानंतर चेहरा आणि हात स्वच्छ धुवा.
- सतत शिंका येत असतील तर दुर्लक्ष करु नका
सकाळी उठताच शिंका येणे, नाक बंद होणे किंवा डोळ्यांना खाज येणे याचा अर्थ प्रत्येक वेळी सर्दी झाली आहे असे नाही. डस्ट माइट्स, पोलन, मोल्ड किंवा घरातील इतर ॲलर्जेन्स यामागे कारणीभूत असू शकतात.
जर ही लक्षणे वारंवार होत असतील, अनेक आठवडे टिकत असतील किंवा त्यासोबत श्वास घेण्यास त्रास, घरघर किंवा छातीत जडपणा जाणवत असेल, तर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टर किंवा ॲलर्जी तजज्ञांचा सल्ला घ्या. योग्य कारण समजल्यानंतर ट्रिगरपासून बचाव आणि आवश्यक उपचारांच्या मदतीने माॅर्निंग ॲलर्जी नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
▪️ संकलन : यशवंत वाघ

0 टिप्पण्या