विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/8/2026 :
"अभ्यासाला बस" असे पालकांनी सांगितल्याशिवाय तुम्ही स्वतःहून मनापासून कधी अभ्यासाला बसता का? अभ्यास करताना काहीतरी क्षुल्लक कारण काढून सारखे-सारखे उठायची सवय आहे का? वाचन करताना नजर पुस्तकात, पण डोक्यात भलतेच विचार... असे तुमच्या बाबतीत होते का?
सर्वसाधारणपणे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात असे नक्कीच घडते; पण आता यात योग्य बदल केलेच पाहिजेत. ठराविक वेळेत आपण स्वतःहून अभ्यासाला बसलेच पाहिजे. पालकांनी रोज तेच तेच सांगण्याची गरजच का पडावी?
मुलांनो, एकदा अभ्यासाला बसले की कोणत्याही कारणाने मधून मधून उठायचे नाही आणि आपले संपूर्ण लक्ष अभ्यासातच असेल याची काळजी घ्यायची; मन अजिबात इकडेतिकडे भरकटू द्यायचे नाही.
नियमितपणे ठराविक वेळ मन लावून एकाग्रतेने केलेला अभ्यास आयुष्यभर उत्तम स्मरणात राहतो.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या