विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/8/2026 :

श्रावण महिना म्हटले की सणांची अखंड मालिका सुरू असते; यात राष्ट्रीय सणही साजरे होतात. प्रत्येक सणाचे महत्त्व समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यामागील परंपरा व धार्मिक महत्त्वाच्या जोडीला वैज्ञानिक कारणेही समजावून घ्यायला हवीत.

नागपंचमी हा सण साजरा करताना महिला आदल्या दिवशी भावासाठी उपवास करतात. प्रत्यक्ष वारुळाला जाऊन किंवा प्रतिमेची पूजा करून नागोबाला भाऊ मानले जाते आणि पंचमीदिवशी महिला व मुले एकत्र येऊन भरपूर खेळ खेळतात.

श्रावण म्हणजे पावसाळ्याचे दिवस, सर्वत्र दाट हिरवळ असते. अशा दिवसांत बिळांत पाणी भरल्याने अनेक साप बाहेर पडतात. निसर्गतः साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे; पण साप दिसला की त्याला लगेच मारण्याची मानवी प्रवृत्ती दिसते. महिला वर्गातील भीती दूर करून त्यांच्यात व सापांमध्ये एक भावनिक नाते निर्माण व्हावे आणि सापांना जीवदान मिळावे, हा या सणाचा मूळ उद्देश आहे.

पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्याचा समान अधिकार आहे; त्यांच्या अस्तित्वामुळेच पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो, हे आपण नेहमी लक्षात ठेवूया.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या