विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/8/2026 :
आपल्याला जसे जिवाभावाचे मित्र असतात, तसेच काही निंदकही असतात. त्यांना थेट शत्रू म्हणता येणार नाही; पण ते आपल्या पाठीमागे इतरांजवळ नेहमी आपल्यातील उणिवांबद्दल बोलत असतात.
ही मंडळी फार फार तर आपली निंदा करतील, आपल्याबद्दल चुकीचे बोलतील, आपल्या यशाने त्यांना आनंद होणार नाही किंवा आपल्याबद्दल गैरसमज पसरवतील; तरीसुद्धा आपण त्यांचे मनोमन आभारच मानले पाहिजेत!
मुलांनो, अशा वेळी सुरुवातीला आपल्याला नक्कीच वाईट वाटेल किंवा त्या व्यक्तीचा राग येईल; पण या गोष्टींकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिका. त्यांनी दाखवून दिलेल्या त्रुटी आणि उणिवा लक्षात घेऊन त्या वेळीच दुरुस्त करण्याची एक सुवर्णसंधी आपल्याला मिळते.
निंदकांचे नेहमी आभार माना; कारण तेच आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि अधिक परिपक्व होण्याची संधी देतात!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या