🔰पूर्वी गावाबाहेर चिंचेचं झाड का असायचं?

 🔰पूर्वी गावाबाहेर चिंचेचं झाड का असायचं? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 17/8/2026 :

पूर्वी एखाद्या गावाबाहेर चिंचेचं झाड असलेलं आपण अनेकदा बघितलं आहे. पण त्याचं कारण तुम्हाला माहिती का? याचं वैज्ञानिक कारण मारुती चितमपल्ली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. वैज्ञानिक कारण,

मारुती चितमपल्ली यांच्या मते, चिंचेच्या झाडात विलक्षण अर्थिंग क्षमता असते. ही क्षमता विजेच्या संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

*विजेपासून गावाचं संरक्षण,*

पावसाळ्यात गावात विजा पडण्याचा धोका असतो. गावाभोवती चिंचेची झाडं लावल्यास ती विजेचा प्रवाह जमिनीत उतरवतात, ज्यामुळे गावकऱ्यांचं आणि घरांचं रक्षण होतं.

*चिंचेचं झाड आणि अर्थिंग,*

चिंचेच्या झाडाची मुळे खोलवर जातात आणि त्यात विजेचं वहन करण्याची नैसर्गिक क्षमता असते. यामुळे वीज खेचली जाऊन जमिनीत मिसळते, ज्याने नुकसान टळतं.

*वादळात सावधगिरी,*

चितमपल्ली सांगतात की, वादळात चिंचेच्या झाडाखाली उभं राहू नये. कारण झाड विजेला आकर्षित करतं आणि ती जमिनीत घेऊन जातं,

*पर्यावरण आणि चिंचेचं योगदान,*

चिंचेची झाडं केवळ विजेपासूनच नाही, तर पर्यावरणालाही लाभ देतात. त्यांची सावली, फळं आणि लाकूड गावकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतं.

*चिंचेची झाडं जोपासण्याची गरज,*

गावकऱ्यांनी चिंचेची झाडं लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी, असं चितमपल्ली आवर्जून सांगायचे.

✍️मारुती चितमपल्ली

✍️ संकलन : प्रविण सरवदे कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या