चीन बांधतोय जगातील सर्वात मोठा पूल !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/8/2026 :
चीन मध्ये जगातील सर्वात मोठ्या पूलाचे काम सुरू आहे. या पुलाला हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज असे नाव देण्यात आले आहे आणि तो बांधण्यापूर्वीच चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर या पुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशातील ग्रामीण भागांना जोडणी देण्या व्यतिरिक्त, हा पूल पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण देखील असणार आहे.
पूल बांधण्यासाठी अंदाजे २८० मिलियन डॉलर खर्च आला. पुलाची लांबी एक मैल लांब आणि आयफेल टॉवर पेक्षा सुमारे २०० मीटर उंच आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे या पुलावरून एक तासाचा प्रवास फक्त एका मिनिटात पूर्ण करता येणार आहे. चीनने या पुलाचे बांधकाम फक्त तीन वर्षा पूर्वी म्हणजे २०२२ मध्ये सुरू केले होते. या वर्षी जून पासून तो पूल सर्वसामान्यांना वापरता येणार आहे.
हा सुपर प्रोजेक्ट चीनच्या अभियांत्रिकी क्षमता वाढवेल आणि गुइझोऊचे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनण्याचे ध्येय साध्य होईल. पूलाच्या स्टील स्ट्रक्चरचे वजन सुमारे २२,००० मेट्रिक टन आहे. हे तीन आयफेल टॉवर्सच्या बरोबरीचे आहे आणि ते फक्त दोन महिन्यात बसवण्यात आले आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या