विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/8/2026 :
आपल्या नात्यांतील व आसपासच्या लोकांचे आपण जेव्हा निरीक्षण करतो, तेव्हा त्यांच्या रुबाबाचे, मोठेपणाचे व स्वभावाचे आपल्याला खूप कौतुक वाटते. मोठे झाल्यावर आपणही त्यांच्यासारखेच वागण्याचे ठरवतो.
जसे की, उच्चशिक्षित असणारे, चांगल्या पदावर कार्य करणारे, समाजात मोठा मान-सन्मान असणारे, अपार कष्ट करून शिकलेले, उत्तम बोलणारे-वागणारे आणि इतरांना मनापासून मदत करणारे सज्जन लोक आपले खरे आदर्श नक्कीच असावेत.
मुलांनो, समाजात लबाड, भ्रष्टाचारी, फसवणूक करणारे, चुकीच्या मार्गाने कमाई करणारे आणि नीतिमत्तेची चाड नसणारे लोकही असतात. आपण स्वतः ठरवायचे की आपण कसे घडायचे आणि कोणाचे अनुकरण करायचे!
व्यक्तीची खरी पारख करायला शिका; कारण 'चकाकते ते सर्वच सोने नसते', हे नेहमी लक्षात ठेवा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या