सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे  आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/8/2026 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये २९ ऑगस्ट २०२६ रोजी Attitude & Experiential Pedagogies for the Next-Generation Teacher या विषयावर एक दिवसीय फॅकल्टि डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांचा संशोधन स्तर उंचाविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेले होते. 

सदर कार्यशाळेमध्ये संशोधन विभागातील तज्ञ प्राध्यापक डॉ. मोहन देशपांडे (Founder Director & Chief Trainer, ACE Soft Skills Solutions मुंबई), यांनी मार्गदर्शन केले. 

सदर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये  प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला. हा  प्रोग्राम निश्चितच प्राध्यापकांना त्यांच्या  भविष्यातील  वाटचालीसाठी उपयुक्त राहील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्य शाळेचे समन्वयक म्हणून प्रा. संजय  झंजे व प्रा. रविकिरण आडत यांनी काम पाहिले असुन सर्व विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्याचे नियोजन व्यवस्थित पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या