मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक1/8/2026 :
आजकाल गाव असो किंवा शहर, सर्वत्रच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे; त्यामुळे निर्धास्तपणे वावरणे कठीण झाले आहे. केवळ मुली किंवा महिलाच नव्हे, तर मुले व पुरुषमंडळीसुद्धा यातून सुटत नाहीत.
किरकोळ कारणांवरून दमदाटी, जबरदस्त मारहाण आणि अगदी जीवे मारण्यापर्यंत मजल जाते. पैशांसाठी रिक्षावाल्यांपासून कोणालाही अडवून लुबाडले जाते. मुली व महिलांवरील अत्याचार तर जणू नित्याचेच झाले आहेत.
गुन्हेगार केवळ पुरुषच आहेत असेही नाही; सध्या सर्व स्तरांतील स्त्रियाही गुन्हेगारी विश्वात दिसून येतात. यावर कडक कायदे करणे, पोलिसांचा सज्जड धाक असणे आणि न्यायव्यवस्थेने झटपट न्याय देऊन कठोर शिक्षेची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.
आजचा संकल्प
आपण प्रत्येकाने नीतिमत्तेने वागणे व समोरील व्यक्तीला 'माणूस' समजून तिच्याशी माणसाप्रमाणेच वागणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊ आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचा मनापासून प्रयत्न करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या