मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/8/2026 :

एकमेकांशी संवाद साधताना आपण जेव्हा व्यक्त होतो, तेव्हा आपल्या मनातील विचार आपण बोलून दाखवतो; पण वेळ-काळ आणि प्रसंगाचे भान ठेवून व्यक्त होणे कधीही अधिक योग्य ठरते.

आपले बोलणे आणि हास्य समोरच्या व्यक्तीला रुचेल व पटेल असेच असावे. कोणाच्या मनाला लागेल, कोणाचे मन दुखावेल किंवा गैरसमज निर्माण होतील असे मुळीच नसावे. माणसांत रुसवे-फुगवे असावेत; पण ते तेवढ्यापुरतेच मर्यादित हवेत.

आपल्या बोलण्या-वागण्यातून परस्पर संबंध बिघडू नयेत आणि नात्यांत दरी पडू नये याची जर आपण सर्वांनी काळजी घेतली, तर येणारा प्रत्येक दिवस आपल्याला निखळ आनंद देईल.

आजचा संकल्प

ज्या गोष्टींमुळे दोन व्यक्ती, कुटुंबे किंवा समाजात मतभेद होऊन दुरावा निर्माण होतो, त्या गोष्टी करण्याचे काटेकोरपणे टाळू आणि परस्पर सलोखा व प्रेम वाढवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या