मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 31/8/2026 :

दैनंदिन जीवनात येता-जाता आपल्या कानावर अनेक गोष्टी पडतात. इच्छा असो वा नसो, ऐकू येतात म्हणून त्या सर्वच गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात. मनाला आनंद देणाऱ्या, ज्ञान वाढवणाऱ्या आणि उपयुक्त गोष्टीच नेहमी लक्षात घ्याव्यात.

ही बाब नीट समजली तर आपण बोलतानाही नेमके व गरजेचेच बोलू. अवाजवी आणि ज्या गोष्टी कोणी मनावर घेणार नाही, अशा निरर्थक विषयांची चर्चा करून काय उपयोग? जर आपले बोलणे मुद्देसूद व समर्पक असेल, तरच लोक ते मन लावून ऐकतील.

थोडक्यात काय तर, बोलणे व ऐकणे या परस्परांवर अवलंबून असणाऱ्या दोन महत्त्वाच्या क्रिया आहेत. बोलणारी व्यक्ती विचारपूर्वक व विषयाला धरून नेमके बोलत असेल, तर ऐकणारी व्यक्तीसुद्धा तेवढ्याच आस्थेने आणि लक्षपूर्वक ऐकते.

आजचा संकल्प

आपले बोलणे बाष्कळ असू नये; आपण बोलणे सुरू केले की कोणीही आपल्याला दुर्लक्षित करू नये याची काळजी घेऊ आणि नेमके, प्रभावी व योग्य पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या