मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/8/2026 :

आपण आपल्या प्रत्येकाची जात व धर्म अभिमानाने सांगतो आणि लिहितो. प्रत्येकाला आपल्या जातीचा व धर्माचा सार्थ अभिमान वाटतो. आता परिस्थिती बरीच बदलली आहे; पण पूर्वी जातीबाहेर रोटी-बेटी व्यवहारही केला जात नसे.

आपल्या जातीचा अभिमान असणे स्वाभाविक आहे, पण इतरांच्या जाती-धर्माला कमी लेखणे किंवा नावे ठेवणे पूर्णपणे अयोग्य आहे. प्रत्येक धर्माची शिकवण पाहिली, तर त्यामध्ये माणुसकी आणि सकारात्मक नैतिक संस्कारांचीच मूल्ये पाहायला मिळतात.

धार्मिक विधी व व्यक्तिगत अभिमान हा घराच्या उंबऱ्याच्या आत ठेवून, बाहेर आपण सर्व एक आहोत या उदात्त भावनेने वागले पाहिजे. जात-धर्म घरापुरता मर्यादित ठेवून बाहेर पाऊल टाकले की, 'आपण सर्व भारतीय आहोत' ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनात जागी हवी.

आजचा संकल्प

'मानव हीच जात व मानवता हाच धर्म'* ही भावना आपण प्रत्येक जण मनात ठेवू. कोणत्याही धार्मिक संघर्षाला थारा न देता, एकमेकांशी आपुलकीने वागू व परस्पर आत्मीयता जपू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या