सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/8/2026 : शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिना निमित्त सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे सचिव सुहास यादव यांनी सांगितले की देश प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत रहावे आजचे युवक हे देशाचे उद्याचे भवितव्य आहेत देशाच्या प्रगतीची वाटचाल महासत्तेच्या दिशेने होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यामध्ये त्यानी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी थोर क्रांतीकारकांनी केलेल्या कार्याची माहिती आजच्या पिढीतील विद्यार्थी कु. श्रेया शिंदे व चि. हर्षद गिरमे यांनी सांगितली. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. संजय झंजे तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अंकिता फडे व वरिष्ठ लिपिक मिनाक्षी राऊत यांनी केले.


0 टिप्पण्या