मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/8/2026 :
आपले जीवन क्षणभंगुर आहे, 'आज आहे तर उद्या नाही' अशा गोष्टी आपण नेहमी बोलतो. पण खरेच त्या मनापासून बोललेल्या असतात का? जर जीवन क्षणभंगुर आहे हे आपल्याला ठाऊक आहे, तरीही पुढील कित्येक वर्षांचे नियोजन आपण कसे करतो?
लहानपणापासून आपल्यासाठी पालकांचे आणि मोठे झालो की स्वतःसाठी आपले स्वतःचे नियोजन सुरू होते. पुढील उच्च शिक्षणाचे, संसाराचे, मुलाबाळांचे व त्यांच्या भविष्याचे विचार आपल्या डोक्यात सतत चालू असतात.
नियोजन हवेच आणि ते नेमके असावे; मात्र ते करताना आपला वर्तमानकाळ आपल्या हातातून निसटता कामा नये. अनेक जण केवळ भविष्याची तरतूद करण्याच्या नादात आपला वर्तमानकाळ वाया घालवतात; तसे होणे योग्य नाही.
आजचा संकल्प
भविष्यकाळाचे योग्य नियोजन नक्की करू; पण ते करताना वर्तमानकाळ आनंदाने जगू, त्याचा मनसोक्त उपभोग घेऊ आणि या क्षणभंगुर आयुष्यातील प्रत्येक क्षण समरसून जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या