⏹️ पावसाळ्यात घ्यायची काळजी

 ⏹️  पावसाळ्यात घ्यायची काळजी

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/8/2026 :

तुळस, हळद आणि आले यांचा काढा आयुर्वेदात एक शक्तिशाली नैसर्गिक पेय मानला जातो. या तिघांच्या संयोजनातून मिळणारे फायदे शरीर, मन आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

*तुळस+हळद+आले काढा पिण्याचे फायदे*

*१)* रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तुळस शरीराला बळकटी देते. हळद शरीरातील सूज व विषारी घटक कमी करते. आले संक्रमणांपासून संरक्षण करते.

*२)* या काढ्यामुळे छातीत जमा झालेला कफ वितळतो. घसा खवखवणे आणि गळ्याचे इन्फेक्शन कमी होते. विषाणूजन्य तापात उपयोगी.

*३)* आले आणि हळद पचनास चालना देतात. गॅस, अपचन, पोटदुखी यावर फायदेशीर. चहा ऐवजी हा काढा पिल्यास पचन क्रिया सुधारते

*४)* हळद आणि आले शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. यकृत (लिव्हर) आणि मूत्रवहिनी शुध्द राहते.

*५)* तुळस आणि आले दोघेही नैसर्गिक शांततादायक घटक आहेत. मन शांत राहते, झोप चांगली लागते.

*काढा बनवण्याची पध्दत*

# १ ग्लास पाणी उकळा.

# त्यात ५-७ तुळशीची पाने, १ छोटा चमचा हळद, १ चमचा किसलेले आले टाका.

# ५-७ मिनिटे उकळा.

# गाळून गरमच प्यावे. हवे असल्यास मध घालू शकता. गरम काढा थोडा थंड झाल्यावरच.

# रोज एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्यावा.

# या काढ्यात हिवाळ्यात दालचिनी, मिरी सुध्दा घालून त्याची प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकता.

गेट लाईफ लेझर पाइल्स हॉस्पिटल

लाली लॉन समोर, ओल्ड बायपास रोड

अमरावती

9158882450

संकलन : अनिल साखरकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या