Bethlehem Kudumba Unit (बेथलेहेम कुटुंब यूनिट )

 


Bethlehem Kudumba Unit (बेथलेहेम कुटुंब यूनिट ) 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/8/2026 :

एक ३५-३७ वर्षाचा हीरो ( निविन पौली ) व २२ वर्षांची / कॉलेज मधून जस्ट बाहेर पडलेली नायिका ( ममिता बैजू ) यांची मैत्री / संबंध कसे जुळतात. ही गोष्ट तशी काही नवीन नाही हे खरे, पण हा मल्याळम सिनेमा का भावतो त्याचे कारण आहे की नर्म विनोदाच्या धाटणी ने बांधलेली गोष्ट / आपल्याच आजूबाजूला वावरणारे सह कलाकार / नॅच्युरल सेटिंग व उत्तम सबटायटल्स नी माझ्यासारख्या मल्याळम आजिबात न समजणाऱ्याला हा सिनेमा प्रचंड म्हणजे अति प्रचंड आवडला.

दारुड्या बापामुळे घरची परिस्थिति वाईट झाल्यामुळे आपले जुने घर विकून ॲशली (ममिता बैजू ) आणि तिचे कुटुंब एक तुलनेने अधिक शहरी वस्तीचे ठिकाण आहे अश्या भागात स्थायिक होतात. त्यांच्या शेजारीच जस्टिन (निविन पौली)  आणि त्याचे कुटुंब राहते; जस्टिन हा त्या परिसरातील एक अत्यंत विश्वासू आणि मदतीला तत्पर असणारा व्यक्ती आहे. केटरिंगचा व्यवसाय चालवत असल्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी जेवणाची सोय करणे असो किंवा एखादे उपकरण दुरुस्त करून घेणे असो अशा जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी लोक त्याच्याकडेच धाव घेतात. थोडक्यात सांगायचे तर, तो त्या भागातील एक 'स्थानिक सुपरस्टार'च आहे. आणि तो अजून अविवाहित आहे.

ॲशली त्या नवीन परिसरात हळूहळू आपले आयुष्य उभारू लागते आणि जसजसा काळ जातो, तसतसे तिला जस्टिनबद्दल प्रेम वाटू लागते. जस्टिनही कालांतराने तिच्या प्रेमात पडतो. वयात असलेल्या मोठ्या अंतरांमुळे  त्यांना त्यांचे नाते गुपित ठेवावे लागते, कारण त्यांना कल्पना असते की त्यांचे कुटुंबीय याला सहजासहजी मान्यता देणार नाहीत. पण एके दिवशी, हे गुपित उघडकीस येते.

यातून जस्टीन / ॲशली कसे मार्ग काढतात, त्यांना मित्र / शेजारी व इतर कसे मदत करतात हे फार छान दाखवले आहे ते प्रत्यक्ष पहा !

'बेथलहेम कुटुंब युनिट'चे (Bethlehem Kudumba Unit) सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील गोष्टींशी प्रेक्षकांना वाटणारे आपलेपण. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट एक अतिशय सुखद आणि ताजेतवाना अनुभव देतो. या चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींपैकी बहुतांश घटना एकतर आपल्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या असतात किंवा आपण त्या आपल्या ओळखीच्या कोणाच्या तरी आयुष्यात घडताना पाहिलेल्या असतात. मग ती जस्टिनच्या लग्नाविषयी होणारी चर्चा असो, हौशी लघुपट बनवताना जोयलला येणारी 'धडपड' असो, किंवा जस्टिन आणि ॲशली यांना त्यांचे नाते गुपित ठेवताना करावा लागणारा संघर्ष असो; या चित्रपटातील प्रसंग आणि कथानकातील विविध पैलू प्रेक्षकांच्या मनाला सहजपणे भिडतात.

किती गोड सिनेमा करावा ! २५ कोटी बजेट वर या सिनेमाने ६ दिवसांत १०० कोटीचा गल्ला जमवला आहे. फाहाद फासिल ( फाफा ) याचा प्रोड्यूसर आहे. 

© Dinesh Vaidya, Pune.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या