🔰 सदगुरु गहिनीनाथ अर्बन बँकेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न 🟣 सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

 

🔰 सदगुरु गहिनीनाथ अर्बन बँकेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

🟣 सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/8/2026 : येथील सदगुरु गहिनीनाथ को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर येथे अत्यंत  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर होऊन सभासदांना १० % लाभांश जाहीर झाला.

ज्येष्ठ सभासद हरिदास कांबळे यांच्या हस्ते गहिनीनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे चेअरमन ॲड. शिरीष ताराचंद फडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की बँकेत चालू वर्षी रु.४५ .९७  लाख  इतका नफा झाला असून सभासदांसाठी १०%  लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या रु.४४.०४ कोटी इतक्या ठेवी असून रु.२५.४९ कोटी इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा नेट एन.पी.ए. 0% आहे. शेवटी त्यांनी सर्व सभासद आणि ठेवीदार यांच्या हितासाठी पारदर्शकतेने आणि जबाबदारीने कार्य करत राहू असे आश्वासन दिले. बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सर्व संचालक व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल अभिनंदन करून माळशिरस तालुक्यात सहकार क्षेत्रात बँक उत्तम प्रकारे काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. संजय दोशी यांनी सर्व ठेवीदार व सभासद यांना विश्वास दिला की बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहील यासाठी सर्व संचालक मंडळ प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करीत राहील. तसेच बँकेचे सभासद महादेव बंडगर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या वार्षिक सभेस बँकेचे चेअरमन ॲड. शिरीष ताराचंद  फडे, व्हाईस चेअरमन संन्मती सोनाज, बँकेचे संचालक ॲड. संजय दोशी,  प्रकाश पाटील, अजित गांधी, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ. मिलिंद खाडे, भरतेश वैद्य, निलेश गिरमे, डॉ.अभिजीत गांधी व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे, मॅनेजर मनोज मंगरूळे व सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते. कार्यक्रमाचे अहवाल वाचन बँकेचे सीनियर अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या