🍀 रानभाजी - केना 🍀
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/8/2026 :
केना वनस्पती पावसाळ्यात ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला वाढते. हिचा कालावधी जून ते सप्टेंबर महिना असतो. केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. केनाला छोटी तीन पाकळ्यांची निळसर जांभळी फुले येतात.
*औषधी गुणधर्म*
# पचनक्रिया चांगली होऊन पोट साफ होते.
# त्वचाविकार, सूज कमी होते.
# लघवी साफ होण्यास मदत होते.
*केनाचे वडे*
# साहित्य- केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर.
# कृती- एक पातेले घेउन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मळून घ्यावे. नंतर एक कढई घेउन त्यात तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे वडे बनवून लालसर होई पर्यंत तळून घ्यावेत.
*केनाचे थालीपिठ*
# साहित्य- केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथबीर, ओवा, तीळ.
# कृती- एक पातेले घेऊन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर, ओवा, तीळ टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन पातळ मिश्रण करावे. नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर चमच तेल टाकुन त्यावर वरील मिश्रण टाकुन वर्तुळाकृती पसरवावे व त्याला झाकुन घ्यावे. काही वेळा नंतर झाकणी काढून त्याला पलटवून पुन्हा एक चमच तेल टाकुन शिजवावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची केनाचे थालीपीठ तयार होतील.
*केनाचे भजे*
# साहित्य- २० ते २५ केनाची पाने, २ मोठे चमचे बेसन, १ मोठा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा हळद, तिखट, धणे पावडर, चवीनुसार मीठ, आवडीनुसार ओवा, तळण्यासाठी तेल.
# कृती- केनाची पाने धुऊन निथळत ठेवावीत. उर्वरित साहित्य एकत्र करून भजीचे पीठ भिजवून घ्यावे. कढईत तेल कडकडीत तापवून केनाची पाने भजीच्या पिठात बुडवून तळावीत. खमंग, कुरकुरीत भजी तयार.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट
====================

0 टिप्पण्या