प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दि.23रोजी अकलूज येथे आट्यापाट्या स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन


प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दि.23रोजी अकलूज येथे आट्यापाट्या स्पर्धेचे भव्य स्वरूपात आयोजन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/8/2026 :

सन १९७८ पासून कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज ने मंडळाचे संस्थापक जयसिंह  मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, बालक्रीडा स्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा, कुस्ती स्पर्धा याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दिवाळी फराळ रत्नाई मिठाई वाटप, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याच पद्धतीने याही वर्षी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष  संग्रामसिंह मोहिते पाटील, मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, युवा नेते  सयाजीराजे  मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे भव्य राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

यास्पर्धेस राज्यातील मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस यासह विविध भागातील अनेक संघांनी सहभाग घेऊन ग्रामीण भागातील अस्सल मर्दानी खेळाचा आनंद लुटला आहे व भरघोस बक्षिसे मिळविली आहेत. 

 या स्पर्धेसाठी भव्य अशी १ लाख ३० हजार रु.ची बक्षिसे  ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास रुपये ४४ हजार, द्वितीय क्रमांकास रुपये ३३ हजार, तृतीय क्रमांकास रुपये २२ हजार, चतुर्थ क्रमांकास रुपये  ११ हजार  तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघास प्रत्येकी रुपये ५ हजारा चे बक्षीस देण्यात येणार आहेत. 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागी संघास रुपये  पाचशे अशी नाममात्र प्रवेश फी  ठेवण्यात आली आहे. तसेच सहभागी खेळाडूंना मंडळाच्या वतीने मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे. 

या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ९८६०३३१७१७ व ९३२५२५२९९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण, संचालक व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या