कामाठीपुरा प्रकरण:- 2️⃣3️⃣

 


कामाठीपुरा  प्रकरण:- 2️⃣3️⃣ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/8/2026 :

*लगोलग तिसऱ्या दिवशी राधेच्या बापानं सूर्यामार्फत खबर काढून हणम्या दादा आणि चिनूच्या बापाची मिटिंग घेऊन चिनूच्या प्रेमपतंगाचा डोर कायमचा कापून टाकलेला.*

त्या दिवसापासून राधा चिनूला कधीच दिसली नाही. ना शाळेत, ना कामाठीपुऱ्यात, ना राजस्थानमध्ये.

चिनूने तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. राधेला रातोरात गायब करण्यात आलं. तिच्या कुटुंबाने पण कामाठीपुऱ्यातलं दुकान, राहते घर विकून हळूहळू कामाठीपुऱ्याचा निरोप घेतला.

राधा गुडूप झाली चिनूच्या आयुष्यातून. 

लांबड्या चाळीत शाळा झाली. बुद्ध विहारामुळे चाळीला — चंद्रमणी बुद्ध विहार मार्ग, असं सुबक नाव मिळालेलं. झोपड्यांची पक्की बैठी घरं झालेली. आतल्या पोटमाळ्यासह. कौलारू टुमदार चाळ दिसायची. त्यात दहावीपर्यंत असलेली शाळा ही झाली. वेगळीच चकाकी मिळालेली चाळीला.

तळ्याचं मैदान झालेलं. मैदानात उंच पाच मजली इमारत.

खेळाचं मैदान गेलं तेव्हा लोक चरफडले पण शाळा होतेय म्हणून आनंदले देखिल. पहिली ते दहावीपर्यंतची कोरी करकरीत शाळा. नव्या रंगाची शाळेची इमारत लांबड्या चाळीत उठून दिसत असे.

शाळा सुरु झाली तशी तिच्याभोवती फेरीवाले जमू लागले. चिंचा, बोरं, आंबा, स्टार, आवळा अशा आंबट-गोड पदार्थांचा ढीग असलेल्या गाड्या. आईस क्रीम, पाणीपुरी, फळं, सँन्डवीच असल्या स्टॉलची झुंबड उडू लागली. पासकीन मामाने भजीचा ठेला लावला.

फेफ्टी हफ्ते घ्यायचा ह्या सगळ्यांकडून पासकीन मामा अपवाद. फेफ्टी दोन रुपये घ्यायचा फेरीवाल्यांकडून प्रत्येक सेशनचे. नाही देणार त्याला लाथेने उडवायचा तो. दिवसाला पन्नास-साठ जमा व्हायचे त्याच्या खिशात. चांदीच होती.

सहा जण समजा पिला हाउसला सिनेमा बघायला गेले. आल्फ्रेड टॉकीजचा रेट होता एक रुपया पाच पैसे. सहा जणांचं तिकीट आणि इंटर्व्हलच्या सामोशाचा खर्च मिळून जेमतेम वीस रुपये व्हायचे. बाकीचे पैसे फेफ्टीच्या खिशात.

मागेल कोण हिशोब त्याच्याकडून? दिवस फिरलेत काय! अन् फेफ्टीच्या कनवटीला दीड फुटाचा रामपुरी असायचा.

'गब्बर का इलाज खुद गब्बर है' ह्या तत्वावर शाळेसमोरील फेरीवाले फेफ्टीला हफ्ता देत.

कुणी हफ्ता नाही दिला तर त्याचा माल रस्त्यावर आणि तो रक्तात न्हालेला दिसायचा.

फक्त पासाकीन मामा आणि पमी ताईचा भज्यांचा स्टॉल हफ्त्याला अपवाद होता. हफ्ता कसा आणि किती घ्यायचा ह्याचा 'ब्रेन बिहाइंड प्लान' पासकीन मामाचा होता.

टपरीत भजी तळत समोर रगडा पॅटीस विकणाऱ्या पामिला 'माझे गरम, पामिचे नरम' असे चिडवत, कांदा भज्जी, पालक भज्जी, बटाटा भज्जी, मिरची भज्जी असल्या अनेक भज्यांचे आयटम तो सेल करी. त्याची मुख्य गिऱ्हाईकं शाळेतली मुलं नसून उजव्या बाजूच्या गल्लीत हणम्यादाच्या कंट्रीच्या अड्डयावर वळणारे अठ्ठावीस म्हणजे बेवडे असत.

कामाठीपुऱ्यात काही गोष्टी अंकात बोलल्या जायच्या. जसे की 'छ्ब्बीस' म्हणजे छावी, 'तीरी' म्हणजे मय्यत, 'सत्ता' म्हणजे लंगडा, 'दस्सा' म्हणजे मेंढी वगैरे वगैरे.

फेफ्टी भाई झालेला आणि पासकीन मामा त्याचा गॉडफादर. दोघे रात्री टपरीत फुग्यातला माल पीत बसायचे. उरलेली भजी चाखण्याला असायचीच.

बाकी चिनू, अरुण, चंग्या, काळ्या, काण्या, अशोक, आन्या ह्यांना बॅकप स्टाफ म्हणून फेफ्टी युज करायचा. म्हणजे खायला फेफ्टी आणि लढायला हे लोक.

दिवस सरत होते. सगळे वयाने, उंचीने, अंगाने वाढत होते. वाढत्या वयाची समज येत होती.

चिनू नि अरुण शाळेत जायचे. बाकीच्यांनी केव्हाच शाळा सोडून दिलेली. 

सातवी, आठवीपासून जिम ज्वाईन करून बॉडी बिल्डर होण्याची स्वप्नं पहाणारी ही मुलं रग्गड व्यायाम करून सातव्या गल्लीतल्या पांडेच्या दुधाच्या डेअरी जमून आलमजेबच्या भावानं अय्युब भायनं तेवढ्यापुरतं स्पॉन्सर्ड केलेल्या पावशेर दुधात ही पोरं आर्नोल्ड नाय तर नाय प्रकाश कोयन्डे होण्याची स्वप्नें उराशी बाळगायची.

ही कामाठीपुऱ्यातली पोरं लव्ह, प्रेम, इश्क, प्यार, मोहोब्बत ह्या गोष्टींपासून खूप लांब होती. कारण ह्यांना ज्या मुली आवडत त्या फक्त ह्यांनाच आवडत. त्या मुलीला ह्या गोष्टीची भनक ही नसे अन् ह्यांच्यात त्या मुलीशी प्रेमाचा इजहार करण्याची धमक ही नसे. सगळा ऑकवर्ड फीलिंग किंवा इंफिरीयोरीटीचा मामला होता. मग काय सगळा राग गच्च लंगोट बांधून जोर आणि बैठकांवर निघायचा.

ह्यांची मुसमुसलेली जवानी आता या सगळ्यांच्या गालावर पुटकूळ्याच्या रुपात दिसू लागलेली. दाढी-मिशांची कोवळी नाजूक वळणं आता डांबरी काळ्याभोर रस्त्याचं रूप घ्यायला लागलेली. आवाजात बदल झालेला. आता ह्यांची बाटली फुटू लागलेली.

स्वप्नदोष, वीर्यपतन ह्यांना कळू लागलेलं.

रात्री जेवल्यानंतर मधूच्या खोलीच्या बाजूच्या बाकड्यावर हे सगळे बसले असताना ह्यांच्यात इंटरेस्टिंग संवाद घडत.

'चंद्या काल बाटली फुटली यार.. सकाळी फुल मांजरपाट झालेली चड्डी' 

'आय झोली.. काय बोल्तो काय.. कोण आलेली रे स्वप्नात? भेंचो कांचन असंल.'

'नाय रे हेमा भाभी होती.'

सगळे लालेलाल.

'आय झवतान पुढं बोल कसा शॉट दिला'

‘साडीत होती.'

‘आयघाल्या साडीच घालते ती. पुढं बोल.'

'यार ती जवळ आली म्हणाली चल ना बाजारात आम्ही आठव्या गल्लीत आलो. अचानक बाजार गायब झाला. बघतो तर आम्ही दोघं बिछ्यान्यावर. भाभीचे गोरे गोमटे बॉल माझ्या छातीशी उघडे. भाभीचे मऊ मऊ कुले मी चिवळतोय. भाभी खाली झोपली फुल नेकेड...नागडी. तिने मला अंगावर ओढून घेतलं. सटासट किस घ्यायला लागली भाभी. घट्ट आवळलं तिने मला. मी सुरु झालो. आ.. आआआआ... एक दोन फटाक्यातच पिचकारी उडाली ना यार.' 

सगळे 'आ' वासलेले. 

चला भाभीकडे राउंड मारून येऊ. फेफ्टी पँटमध्ये कडक झालेल्या अवयवावर हात फिरवत म्हणाला. ...

सगळे ताड्कन उभे राहिले.

भाभी अख्ख्या ग्रुपची फँटसी होती. सगळी कोवळी मुलं या ना त्या निमित्ताने सातवी गल्लीतल्या तिच्या तळमजल्यावरच्या घरापुढे घिरट्या मारायचे. तिच्या घरासमोरील उघड्या वाचनालयाच्या बाकड्यावर सकाळपासून तळ ठोकायची. अंगणात कपडे धुताना दोन्ही पाय छातीशी घेऊन चौड्यावर बसलेल्या भाभीच्या गोऱ्या मांड्यांची जिवघेणी फट दिसायची. ढोपरं छातीशी दाबली जाऊन ब्रा विरहित झिरझिरीत ब्लाउजच्या खिडकीतून डोकावणारी गोरटेली दोन कबुतरं पोरांना येडं करायची. भाभी कपडे धुवायला बसली रे बसली कि बाकड्यावर गर्दी जमा व्हायची. पेपर वाचायची ऍक्टिंग करत मुलं ते दुर्लभ दर्शन मनात साठवून रात्री बिछान्यात किंवा संडासात मोकळं करीत.

भाभी पण मुलांना मनोसोक्त दर्शन घडवायची जेवढी साडी मागे घेता येईल तेवढी घेऊन.

इतकंच काय भाभी चिम्पाट घेऊन हागायला जाताना तिच्या गुजराती पद्धतीने नेसलेल्या साडीतून हलक्या हलक्या नाजूक उडाण भरणाऱ्या नितंबांवर तर लहानथोरांचा भारी जीव.

लुसलुशीत नितंब, किंचित घडी पडणारी कंबर, कंबरेखालची खोल गर्द मोठाली बेंबी... सगळं अमेझिंग होतं भाभीचं. घनघोर तपस्येला भंग करणारी अप्सराच होती भाभी. 

चिनूचं कॉलेज सुरू झालेलं.

चाळीतल्या शाळेवर येणाऱ्या फेरीवाल्यांच्या हफ्त्यावर फेफ्टीची ऐश चाललेली. हल्ली तो रोज पिऊ लागलेला. गोरा, आडदांड फेफ्टी स्वतःला 'मेरे अपने'चा विनोद खन्ना समजायचा. खिशात दीड फुटाचा रामपुरी चाकू बाळगायचा. मावा खाऊन सतत थुंकणारा फेफ्टी गोरगरिबांसाठी कर्दनकाळ झालेला.

त्याच्या कंपूतले चिन्या, आय, चंग्या, मौन्या ही मुलं समजदार होती. आऱ्या एसी मेकॅनिक झालेला, चंग्या ऑर्केस्ट्रा आणि हॉटेलात ढोलक वाजवायचा, पुरा मोहन कारखान्यात कामाला होता. नि चिन्या दहावी पास होऊन कॉलेजात... सगळ्यांचं बरं चाललेलं.

रात्री हे लोक मधूच्या घराच्या बाजूच्या गोडाऊनच्या बाकड्यावर भेटायचे. एरियात ह्यांचा वचक होता पण कुणाचाही गुन्हेगारीचा बॅकग्राऊंड नव्हता. कुणावर केस नव्हती.

फेफ्टीचा अतिरेक आवरायला हे लोक त्याला सतत सांगत, पण तो सगळ्यांना फाट्यावर मारी. आता त्याची संगत सातव्या गल्लीतल्या लुक्क्यांबरोबर झालेली. ह्याआधी कौलावरून उतरून रद्दी चोरणं, देवळातल्या चपला उचलणं इथपर्यंत ठीक होतं. पण आता तर त्याने गोडाऊन फोडून हातगाडी लावून अख्खा माल उतरवला तेव्हा ह्या लोकांची सटकलेली.

फेफ्टी हळूहळू प्रोफेशनल चोर होत चाललेला त्याच्याही नकळत. हे बरं नव्हतं. गॅब्रीडीयन पँट आणि बॉस्कीच्या कपड्यात तो वावरायचा. शाळेतल्या मुलींना छेडू लागलेला. त्यांच्या अंगाला हात लावायचा.

त्या दिवशी शाळेचे प्रिन्सिपॉल पासकीन मामाला सांगत होते 'इधर लडकीयोंकी छेडखानी बहोत हो रही है. बहोत कम्प्लेन आया है मेरे पास, आप उनके माँ बाप को बतावो, उन बच्चों को समझावो, चाहे तो मैं साथ चलता हुं. देखो हम पुलिस कम्प्लेन नही करना चाहते हैं. युथ है सारे. उनकी जिंदगी हम बरबाद नही करना चाहते है. प्लीज समझावो उनको.' खूप समजदार होते प्रिन्सिपल. 

सिरीयस म्याटर...

संध्याकाळी मामाने सगळ्यांना बोलावून घडलेला वृत्तांत सांगितला. मामावर हे सगळे चढले. तूच बिघडवलास म्हणून.. मामाने हातापाया पडून ह्यांना फेफ्टीला आवरायला विनंती केली.

ठरलं.. फेफ्टीला समजवायचं... नाय ऐकला तर गांडूला कोपच्यात घ्यायचं.

‘काय उपटायचं ते उपटा भेन्चोद' खाडकन चिनूच्या कानाखाली काढत फेफ्टी गरजला. अरुण, चंग्या, काळ्या अवाक् झाले.

फेफ्टी भेटेल म्हणून ह्या सगळ्यांनी मंगळवारी सुट्टी काढलेली. अन फेफ्टी भेटलेला.

'हे बघ तू काय पण कर, भाई हो, गेम वाजव, चोरी कर लुटमार कर आपल्याला काय घेणं-देणं नाय यार. फक्त मुलींना छेडू नकोस' चिनू त्याच्यावर नजर रोखत म्हणाला.

‘किसको छेडा बे.. नाम बता गांडू' फेफ्टी हल्ली हिंदीत बोलत असे. सातव्या गल्लीतल्या लुक्क्यांची संगत.

'लडकीको छेडा, दबाया. कम्प्लेन आ रही है बावा, आपल्या पण आयबहिणी आहेत.' अरुण बोलत असताना त्याच्या पण कानफाडीत फेफ्टीनं ठेवून दिली. 

'मारतो कशाला गांडू? तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय ना आम्ही? भेन्चोद आपल्या बहिणीला कोणी छेडलं तर कशी गांड जळल यार' असं म्हणताच चंग्याला पण जोरदार बसली.

रक्तबंबाळ झालेला चंग्या चिनूला बघवेना. चिनू चंग्याला सावरतोय तोच फेफ्टीची लाथ चिनूला बसली. चिनू पोट धरून खाली वाकला.

काट... काट... काट... करत फेफ्टीने रामपुरी उघडला. काय तरी घडणार ह्या भीतीने रस्त्यावर सन्नाटा झाला.

चाळीतले घरांचे दरवाजे बंद झाले. फेरीवाल्यांनी आपापले ठेले आवरते घेतले.

'गांड मे दम है तो आ आगे' फेफ्टीच्या डोळ्यात रक्त साचलेलं. त्याने चिनूला आईवरून शिवी हासडली.

'अबे येडा झाला काय'... म्हणत चिनू, आऱ्या, चंग्या, मौन्या चौघं सावरून उभे राहिले.

फेफ्टीने रामपुरीची पकड घट्ट केली नि तो चिनूवर धावून आला. तो घाव घालणार तोच अरुणने त्याला लाईनटच मारून आडवा केला.

भैसाटलेल्या फेफ्टीचा हलका वार अरुणच्या हातावर झाला. अरुण हटलेला पाहून फेफ्टी लगबगीनं चिनूकडे वळला.

फेफ्टी पिसाटलेला. तो चिनूवर वार करायला धावला इतक्यात चंग्याने त्याच्यावर झेप घेत त्याची कंबर पकडली. फेफ्टी धडपडला. चंग्याची पकड भयानक होती. ती सुटेना म्हणून फेफ्टीने त्याच्या हातावर चाकू फिरवला. चंग्या सरपटला त्याला सोडून फेफ्टी चिनूकडे वळला.

अरुण आणि चंग्याला वार झालेले बघून चिनू आश्चर्यचकित झाला. त्याला विश्वास बसेना की फेफ्टी असं काही करू शकेल. पापलेट आनंदच्या बाकड्यावर रक्तबंबाळ अवस्थेत वार झालेला स्वतःचा हात सावरणाऱ्या चंग्या अन् अरुण चिनूचं लक्ष गेलं. चिनू दोघांकडे वळला इतक्यात अरुणची आरोळी चिनूच्या कानी आली.

'ऐ चिनो.. मागे बघ.'

अरुणची दोन फुटावरची आरोळी ऐकून चिन्या चमकला. त्याने झपकन वळून पाहिलं.

विजेच्या वेगाने फेफ्टीने चिनूवर धाव घेतली...

चिनू नि फेफ्टी दोघं भिडले एकमेकांला... चिनूची खाडकन पडली फेफ्टीच्या थोबाडीत. फेफ्टी पेटला. हातातला रामपुरी तो चिनूवर सैरावैरा फिरवू लागला. रक्ताळलेला हात घेऊन अरुणने मागून त्याच्यावर झडप घातली. अरुणने मागून फेफ्टीला घट्ट पकडून त्याचे हात जखडून टाकले.

'चंद्या गांडू काय करतो... होशमध्ये ये' इतक्या तंग सिच्युएशनमध्ये पण चिनू फेफ्टीला समजवायचा प्रयत्न करत होता.

मागून मोहन आणि चंग्याने येऊन फेफ्टीला घट्ट पकडलं.

‘अरे हाट्’ म्हणून मोठ्याने ओरडत त्याने तिघांची पकड सोडवली. सैतान झालेला फेफ्टी. त्वेषाने चाकू घेऊन तो चिनूवर धावला. चिनूने शिताफीने त्याचा वार वरच्यावर पकडून खाली फिरवला आणि... आणि... त्या वेगवान झटापटीत तो वळलेला हात चाकूसकट फेफ्टीच्या पोटात रुतला.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश.. पुढे... प्रकरण २४

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या