फक्त एका उद्योगपतीच्या ₹22,000 कोटींच्या कर्जाची कहाणी… आणि 55 लाख शेतकऱ्यांसाठी ₹36,000 कोटींची कर्जमाफी!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/8/2026 :
किती विचित्र आहे ना…
एका बाजूला Zee समूहाचे मालक आणि माजी भाजप खासदार सुभाष चंद्रा यांच्याशी संबंधित प्रकरणात ₹22,000 कोटींचे admitted claims समोर येतात… आणि अखेर ₹6.5 कोटींच्या repayment plan ला मंजुरी मिळते.
दुसऱ्या बाजूला…
55 लाख शेतकरी!
ज्यांच्या हातात सोन्याची चमक नाही,
मातीची मळ आहे…
ज्यांच्या घरात एसी नाही,
पण उन्हात जळणारी शेती आहे…
ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती नाही,
पण देशाच्या करोडो लोकांचं पोट भरण्याची जबाबदारी आहे.
या 55 लाख शेतकऱ्यांसाठी ₹36,000 कोटींची कर्जमाफी!
आता जरा आकड्यांची गंमत बघा…
एक उद्योगपती — ₹22,000 कोटींचे दावे!
55 लाख शेतकरी — ₹36,000 कोटींची कर्जमाफी!
म्हणजे एका व्यक्तीच्या कर्जाचा आकडा आणि लाखो शेतकऱ्यांच्या जगण्याचा खर्च…
आणि तरीही या देशात शेतकऱ्यालाच ‘कर्जबाजारी’ म्हणून पाहिलं जातं!
शेतकरी दोन लाखांचं कर्ज घेतो तेव्हा त्याच्या डोक्यावर ओझं येतं.
पण हजारो कोटींच्या कर्जाचा प्रश्न आला की…
कागदावर आकडे असतात, कायदेशीर प्रक्रिया असते, haircut असतो आणि settlement असतं!
शेतकऱ्याने हप्ता वेळेवर भरला तर त्याच्यासाठी काय?
ना कर्जमाफी, ना विशेष सवलत… फक्त ‘तुम्ही तर नियमित कर्ज फेडता’ एवढंच!
किती सुंदर व्यवस्था आहे…
कर्ज थकवलं तर कर्जमाफीची आशा,
आणि प्रामाणिकपणे फेडलं तर प्रामाणिकपणाची शिक्षा!
आणि सर्वात मोठा प्रश्न—
ज्या शेतकऱ्याच्या घामाने देशाचं पोट भरतं, त्याच्या काही लाखांच्या कर्जाची किंमत इतकी मोठी…
पण
एका उद्योगपतीच्या हजारो कोटींच्या कर्जाची गोष्ट इतकी सहज कशी होऊ शकते?
हे कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नाही.
हा प्रश्न आहे त्या व्यवस्थेला—
जिथे गरीबाच्या कर्जाला ओझं म्हणतात,
आणि श्रीमंताच्या कर्जाला ‘financial restructuring’ म्हणतात!
— विजय शालिग्राम इंगळे.
#SubhashChandra #Zee #22000Crore #Farmers #Shetkari #KarjMafi #Maharashtra #NCLT #FinancialJustice #VijayShaligramIngle
===================

0 टिप्पण्या