कामाठीपुरा प्रकरण:- 2️⃣2️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण:- 2️⃣2️⃣

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/8/2026 :

*‘मत मारो... मै माफी मांगता हूं' अल्ताफ.*

*‘माफी तो तू मांगेगा... कल सुबे सुबे...' चिनूची बियर संपलेली.*

*दीड वाजलेला... चिन्या बाहेर आला. बाहेर सगळी पोरं बसलेली.*

‘जा आता घरी जाऊन झोपा. ज्याम मारलाय गांडूला. सकाळी बघू' चिनू त्याच्या रक्ताळलेल्या मुठीकडे बघत म्हणाला.

'ठीकाय' म्हणत सारे पांगले.

चिनू वखारीत आला. चंग्या, आय, फेफ्टी, मौन्या पीत बसलेले. चिनूने त्यांना घरी जा म्हणून सांगण्यात काहीच पॉईंट नव्हता. चंग्याने देऊ केलेला कबाब - पाव त्याने खाऊन घेतला.

अल्ताफ पाय दुमडून पिवळ्या डोळ्यांनी छताकडे बघत बसलेला. फेफ्टी घोरू लागला. मौन्याची झोपमोड झाली. 

'काय विचार करतोस?' त्याने वखारीच्या बाहेर बसलेल्या चिनूला विचारलं. 

‘काय नाय यार... काल्या सुजलाय... उद्या राधाची जर तो माफी मागायला गेला तर ती त्याला ओळखेल काय? नाय तर म्हणायची किस बेवडे को खड़ा किया था... टेन्शन आहे यार' चिनू म्हणाला.

'ओळखेल. नक्की ओळखेल... तुला सांगतो... मनावर आघात केलेल्या माणसाला कुणीच विसरत नाही. आठवतंय शकूताईची केस... तोंडाला फडकं बांधून रेप करणाऱ्यांना तिनं अचूक ओळखलेलं... तेव्हा बच्चे होतो यार आपुन... नाय तर आता त्यांचा लौडा कापून हातात दिला असता त्यांच्या.... ओळखेल राधा ह्याला... आयघाल्याचे डोळे बघ कसले घाणेरडे आहेत.' मौन्या काल्याकडे बघत म्हणाला.

‘एक सांग... इतकं प्रेम करता तुम्ही एकमेकांवर... कशी आहे राधा, काळी की गोरी मी कधीच पहिली नाही... आणि ह्या भेन्चोद लोकांनी पण पहिली नसेल. खूप सुंदर आहे का यार?’ घोरणाऱ्या मित्रांना पाहून काळ्या मोहन बोलला.

'पण इतकं प्रेम करता तुम्ही एकमेकांवर' त्याचा पुढचा सवाल होता चिनूला. 

'बघ उद्या तिला... आणि आम्ही एकमेकांवर नाही प्रेम करत. फक्त मी प्रेम करतो तिच्यावर. बाकीचं माहीत नाय' चिनू बोलताना गुदमरला.

साडे पाच वाजलेले... चिनूने तिघांना उठवलं... प्लान ठरलेला. 

फेफ्टी मुतायला बाहेर गेला तर बघतोय गंडेरीवाल्याच्या गाळ्यात कालची सगळी पोरं निजलेली

'ऐ लवड्यानो... घरी नाय गेलात तुम्ही?' त्याने लाथ हाणत सुन्याला उठवलं

'कोण बे' म्हणत सुन्या उठला तशी सणसणीत कानात पडली त्याच्या. 

‘भाई तू का... कोण नाही गेलं घरी... सगळी जिथं आहेत तिथंच आहेत' सुन्या. 

फेफ्टीने कपाळाला हात लावला.

प्लान बरहुकूम सगळं ठरलेलं.

‘मागे कुणीच यायचं नाही. सारवीमध्ये बसून खिमा पाव खा. आम्ही आलोच' चिनूने सगळ्यांना तंबी दिली.

अल्ताफच्या सुजलेल्या चेहऱ्यावर फेफ्टीने पाणी मारलं. त्याला त्याच्याच कुरत्याने त्याचा चेहरा पुसायला लावला. अल्ताफ विव्हळत होता. उठवला त्याला, त्याच्या खांद्यावर हात ठेवून चिनू 'चल' म्हणाला.

अल्ताफ, चिनू सोबत चाललेत आणि आऱ्या, मौन्या, फेफ्टी त्यांच्या मागून. चंग्याला मोहोल्ल्यात पाठवलेलं.

सातव्या गल्लीचा नाका येताच आऱ्या, मौन्या, फेफ्टी पांगले. तिसऱ्या गल्लीच्या तोंडावर आऱ्या. चवथ्या गल्लीच्या आडोशाला मौन्या. पाचव्या गल्लीच्या पेपर स्टॉलवर फेफ्टी आणि अल्ताफ काल्या चिनूच्या पंजात पाचव्या आणि सहाव्या तू गल्लीच्या तोंडावर असलेल्या दूध केंद्राच्या आडोशाला.

हळूहळू वर्दळ सुरू झालीय. मुलं-मुली शाळेकडे निघालीत.

राधेच्या दोन मैत्रिणी सहाव्या गल्लीतून निघून पाचव्या गल्लीच्या तोंडाशी थांबल्या. तिसरी मुलगी चवथ्या गल्लीतून येऊन त्यांच्या सोबत उभी राहिली. तिसऱ्या गल्लीतून आणखी दोघींसोबत राधा अवतरली तसा सूर्यनारायण आणखी चकाकला. आपले कोवळे किरण तिच्या मुखावर टाकून त्याने तिला गुड मॉर्निंग म्हटलं जणू.

राधा आणि साऱ्याजणी टेन्स वाटत होत्या.

‘पहचाना गांडू' चिन्याने अल्ताफला विचारलं

'हा.. भाय' अल्ताफचा आवाज जड झालेला.

'अब क्या करेगा?' चिनूने सवाल केला.

'माफी मांगुगा भाय... पैर पकडके.' अल्ताफ काल्या जड आवाजात बोलला. 

'क्या बोलेगा?' चिनूने सवाल केला.

'कहुंगा, माफ कर दो बहन. गलती हुई... फिर ऐसा नहीं करूंगा' सुजलेल्या तोंडाने काल्याला बोलता येत नव्हतं. तरी पण त्याने आवाज काढून अॅक्टिंग करून दाखवली.

'यहाऽऽऽ से गुजरेगी वो.' चिनू काल्याला ती जातानाचा मार्ग दाखवत म्हणाला. 'तू जो बोलेगा वो मुझे सुनाई देना चाहिए काल्या. नही तो फिर सेम एपिसोड होगा जिसे देखने के लिये तेरी आंखे नही होगी खुदा कसम बोल देता हुं, अंधा कर दूंगा मै तुझे.' शांत आवाजात चिन्याने डोळ्यात डोळे घातले अल्ताफच्या.

'नै नै मालिक... अभी जाता हूं' काल्या कांपला, थरथरला... भयानक. मुलींचा मोहोल्ल्यातून जाण्याचा बेत अर्थातच बारगळला. नेहमीच्या सातव्या गल्लीच्या दिशेने निघाल्या साऱ्या जणी.

चिनूने काल्याला सोडलं... काल्या निघाला.

सुजलेल्या अवस्थेत, लंगडत, हात जोडत त्यांच्या समोर येणाऱ्या माणसाला बघून सहा जणी थबकल्या. त्यांना वाटलं की कुणी भिकारी असेल. पण जवळ येताच त्याचे पिवळे डोळे बघून त्यांनी ओळखले की हा कालचाच. 

तो जवळ आला तशा ह्या साऱ्याजणी मागे सरल्या. अल्ताफने लांबूनच लोटांगण घातलं सहाही जणीच्या पुढ्यात आणि उठून तोंडात जीव एकटवून मोठ्याने बोलला 'बहन.. मुझे माफ करो.. मुझसे बडी गलती हुई... आयंदा मै किसीके साथ ऐसा नही करूंगा.'

इकडे चिन्याच्या डोळ्यात हसू आणि अश्रूंचं मिश्रण तुंबलं.

'ठीक है... ठीक है माफ किया' म्हणाली त्यातली एक जण अल्ताफकडे त्यांना बघवत नव्हतं.

इतकं ऐकताच अल्ताफ लंगडी घालत पळत सुटला. वाटेत त्याला अरुण, चंग्या दिसले. घाबरत त्याने आणखी वेग घेतला.

राधेनं मान वळवून आजूबाजूला पाहिलं, तिला कुणीच दिसलं नाही. त्या साऱ्या जणी शाळेकडे वळल्या.

ह्या पाच जणांच्या खाणाखुणा झाल्या. शिट्टीसरशी सगळे एक झाले. एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या नि जल्लोष करत सारवी हॉटेलच्या दिशेने निघाले. फेफ्टीने कालची उरलेली क्वार्टर खिशातून काढून कच्चीच ओठांना लावली.

‘च्या गावात, कसली होती रे ती...' नागपाडा सिग्नल जवळच्या सार्वी रेस्टॉरंटमध्ये खीमा-पाव खाताना सगळे डिस्कस करताहेत.

'एकदम शोले ना भाय' चंग्याने चुम्मा घेत म्हटलं.

नास्ता करताना मौन्या म्हणाला 'सही भिडू... लग्न कर गांडू ... लाखात एक हाय पोरगी.'

'लग्नबिग्न दूरची गोष्ट... ती तर भाव पण नाही देत... एक हेल्प केली.. आणि पोरींना कुणी छेडलं तर आपली खसकते... तुला माहीत आहे.' चिन्या म्हणाला.

पोटभर खाऊन सगळे चाळीत आले.

चाळ सकाळी पाचला जागी होऊन, पाणी भरून, आपापल्या मुलांना सकाळच्या शाळेला सोडून निवांत झोपलेली.

सगळे सुमडीमध्ये आपापल्या घरात शिरले. घरच्यांना हे काही नवीन नव्हतं. तशी कुणाला कुणाची काळजीच नसायची. घरात किती मुलं आहेत हे घरच्या कर्त्यालाही माहीत नसायचं. आईला विश्वास असायचा की आपलं मुल कुठेही असलं तरी सुरक्षित असेल.

चिनू घरी आला. आंघोळ केली. अभ्यासाला बसला. डोळे अलगद बंद झाले. तिथेच झोपला. साडे अकराला त्याला आईने उठवलं. कपडे केले, बॅग घेतली. सव्वा बाराला चिनू शाळेला धावला. डाव्या बाजूच्या शाळेकडे न बघता.

आठवडा लोटला. चिनूने त्यांना दिलेलं प्रॉमिस पुरेपूर पाळलेलं. ना तो त्यांच्या दृष्टीस पडत होता आणि त्याही त्याला पाहू शकत नव्हत्या. एक मात्र पक्कं त्या सगळ्या सेफ होत्या. नेहमीप्रमाणे हसऱ्या नि आनंदित होत्या. सगळ्या खबरी संत्या पोहोचवायचा.

चिनूचं रुटीन चाललेलं. सकाळी सहाला त्या साऱ्या जणी येण्याआधी तो जिम गाठायचा. साडे सातला घरी. अभ्यास, शाळा, शाळेतून आला की डिस्पेन्सरी, मग पुन्हा घर, बापाचा तमाशा... नि मग झोप ... झोप कुठे यायची त्याला? राधेच्या आठवणीने व्याकूळ चिनूची रात्र जागती रहायची. उशीत रडायचा, झुरायचा..

सोमवार ... सकाळचे साडे पाच वाजलेले.

चिनू तयार झाला. बॅगेत टॉवेल आणि पाण्याची बाटली भरली. चोख सहा वाजता पोहोचायचं होतं त्याला आज जिमला. रोहिदास सर स्वतः बेंच प्रेसला त्याचे पार्टनर असणार होते.

तो घाईने निघाला. गल्ली गाठली. सरळ चालताना अचानक त्याचं लक्ष उजव्या बाजूला गेलं. पांढुरकं काहीसं दिसलं. तो थांबला, तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या थव्याने त्याला घेरा घातला.

चिनू थिजला.

‘कहा थे इतने दिन?’ उजव्या नि डाव्या बाजूने मुलींनी कव्हर केलेल्या चिनूला अगदी सेंटरमधून फिल्मी एन्ट्री घेत राधेनं विचारलं.

'हम तुमसे पूछ रहे है' बावचळलेल्या चिनूला राधेनं पुन्हा आठवण करून दिली.

चिन्या गप्प उभा.

'हमे थँक्स भी बोलनेका मौका नही दिया भैय्या आपने' तीच ती जिला चिनूचा धक्का लागलेला आणि फुटलेली.

‘थँक्स किस बात का?... मैने ऐसा क्या किया?' डोळ्यात आसवांची जमलेली गर्दी हटवून त्याने ओठांवर हसू आणत म्हटलं.

'चूप रहो... बनो मत' राधा गरजली. 'तेजस्विनी, बतावो इनको के हमे क्या क्या मालूम है’ हाताची घडी घातलेली राधा तिच्या काजळ घातल्या डोळ्यांतनं चिनूचं काळीज चिरत होती.

‘भाई ... दीदी को सऽऽऽब मालूम है' तेजस्विनी म्हणाली अन् सगळ्या हसत शाळेच्या दिशेने धावत सुटल्या.

उरली राधा फक्त नि चिनू

राधा एकटक त्याच्या डोळ्यात रोखून पाहतेय.

'थँक यु' राधा म्हणाली.

'हम' ओठ चावत किंचित मान उंचावत राधेच्या गहिया डोळ्यांकडे बघत त्याने तिचा थँक्स रिसीव्ह केला.

गल्लीत आता दोघंच... शाळेची वर्दळ सुरू झालीय.

'मारधाड पसंद नही है मुझे बहोत हेट करती हुं मै... उस गुंडे की हरकत अगर मैं अपने बाबा को बताती तो वो भी शायद उसका वो हि हाल करते जो तुमने किया. रजपूत हुं मै.'

'मै रजपूत नही हूं' झटक्यात चिनू उद्गारला.

‘जानती हुं... तुम एक नेक इन्सान हो इसीलिये मैने तुम्हारी बातो पे भरोसा रखकर कोई कदम नही उठाया... चिनू' राधेनं त्याच्या डोळ्यात बघत म्हटलं. 

'तुम मेरा नाम जानती हो.' चिनू बावचळला.

'मैं तुम्हारा नाम, उपनाम, तुम्हारी मां, बहन... तुम्हारे बाबा... तुम्हारी जात, धरम... सब जानती हुं... तुम्हे क्या लगता है तुम अकेले फिल्डिंग लगा सकते हो?.... किसे भेजते थे हमे कव्हर करने के लिये हमे घर तक सेफ पहुचानेके लिये. संत्या को ना? हाहाहाहा' सुरेख हसली राधा.

चिनू ओशाळला. दोघेही हसत सुटले.

'जाव तुम्हारे स्कूल का वक्त हो गया है. तुम्हारी सहेलीया राह देखती होगी' चिनूने स्वत:ला सावरत घड्याळाकडे बघत म्हटलं.

'नही जाऊंगी. क्या कर लोगे?' राधा चिनूच्या डोळ्यात पाहत खालचा गुलाबी ओठ पांढऱ्याशुभ्र दातात घट्ट दाबत म्हणाली.

चिनू ठार झालेला. मंद हसला.

‘अच्छा बाबा जाती हुं’ म्हणाली नि थोडी पुढे निघाली. 'सुनो तुम्हारी टेन्थ है ना... जी लगाके पढाई करो. बहोत बडे आदमी बनों' वळून अचानक चिनूच्या जवळ येत ती चिनूला म्हणतेय. 'ये गुंडा गर्दी के चक्कर मे कभी मत पडना हा, ये पुरा इलाखा गुंडोसे भरा हुवा है. हर रोज कुछ ना कुछ होता है. तुम इन सबसे अलग हो चिनू. इन चीजोंसे दूर रहना बहोत बडा आदमी बनो' सिरीयस झालेली राधा.

'हा जिम विम करो. डोले- शोले बनावो. दूध पियो, बादाम खावो. हाहाहा. चलो चलती हुं. थँक्स अगेन' म्हणत हास्याचं कारंजं फुलवून राधा क्षणात अंतर्धान पावली.

तिचा श्वास, तिचा गंध चिनूच्या भोवताली पिंगा घेत होता.

चिनू स्तब्ध उभा. पुतळा झाल्यागत. त्याचा पाय जागचा हालेना. राधा तिथून निघून गेली होती पण ती तिथेच असल्याचा त्याला भास होत होता. चिनूला तिथून हलावसं वाटत नव्हतं.

तिचा रंग, तिचे डोळे, तिचे गुलाबी ओठ, तिच्या शुभ्र दंतपंक्ती, तिचं अलौकिक सौंदर्य. सारं सारं कल्पनेच्या पल्याड आणि त्यातल्या त्यात तिची वैचारिक क्षमता, तिचा समजुतदारपणा, श्रीमंत घरची असताना पण तिचं जमिनीवर असणं, त्यात महत्वाचं म्हणजे तिला चिनूची खडान्खडा माहिती. अगदी नाव, फॅमिली मेंबर, जात... कसलं कमालीचं निरीक्षण असेल ह्या पोरीचं. सगळं सगळं आठवून चिनूला त्याच्या थिटेपणाची कीव आली.

शाळेची कर्कश बेल झाली नि चिनू भानावर आला.

पूर्णपणे शरण गेला तो राधेला.

राधा नि चिनूच्या नियमित भेटीगाठी घडू लागलेल्या विसर्जित झालेले दोघेही एकमेकांत.

त्यानंतर गणपती विसर्जनात ही घटना घडली

वाजंत्री पुन्हा वाजवू लागले. विसर्जनाची मिरवणूक पुढे चालू लागली. चिनू हतबल, नुसता बघत बसला. राधा दूरवर त्याला कुठेच दिसत नव्हती. पुन्हा दिसणार नव्हती कदाचित.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश.. पुढे... प्रकरण २३

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या