कामाठीपुरा प्रकरण 2️⃣1️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
*जिमला न जाता तो आऱ्याच्या बाकड्यावर आला. शिट्टीसरशी अरुण बाहेर पुरा आला. फेरीवाल्याजवळ उभा असलेल्या फेफ्टीला त्याने ईशाऱ्याने बोलावलं. काळ्या मोहन पण मशेरी घासत आला. संत्याला हाक मारली. विहाराकडे नितीन काण्या, पम्या, पावट्या, अव्या, बॉबी या सगळ्यांना बोलवायला संत्याला धाडलं.*
अवघ्या वेळेत सगळे पॅव्हेलिअनमध्ये जमले.
सगळे चिनूच्या इशाऱ्याची वाट बघत होते.
'आज रात्री अल्ताफ काल्याला उचलायचंय.. एका मुलीला हात घातला गांडूनं’ चिनूने सांगितले.
'काय बोलतो ह्यांच्या तं आयला, भेन्चोदचं हे तिसरं मॅटर.. रात्री का आत्ताच? चल ना' नितीन काण्या उठला देखील.
‘पन पोरगी कोन, कुनाचं मॅटर' पावट्या करवादला
‘ये पावट्या... कोण पोरगी, कुणाचं म्याटर... काय गांडूसारखे सवाल करतो बे. यायचं असल तर ये नाय त कल्टी घे' आऱ्या चढला.
'नाय भाई सहज विचारलं' पावट्या.
‘पोरगी शाळेतली आहे. जीव लागलाय आपला...' चिनू बोलता बोलता थांबला. 'कोण कोण माझ्यासोबत येणार त्यांनी थांबा. बाकीच्यांनी कल्टी घ्या. मी एकटा पण काफी आहे.'
‘चूप बे... काय करायचं ते सांग खाली' पावट्या.
‘उचलायचं तर उचलायचं. काल्या असो कि गोऱ्या... असा पन लय दिवस राडा नाय झालाय' पम्याला चेव आलेला.
'संत्या, चिम्या तुम्ही काल्याला ओळखता. म्होल्ल्यात झाडी ठेवा. अन्वरच्या गाळ्यात कॅरम खेळायला येतो तो... तिथून त्याला उचलायचं...' चिनू म्हणाला.
'चिन्या तो पठाणचा एरिया हाय' अंट्याने शंका जाहीर केली. चंग्या पण इतक्यात आलेला.
‘पठाण बिठाण गेला भोसड्यात... काल्याला उचलायचं म्हणजे उचलायचं' चिन्याच्या डोळ्यात अग्नीतांडव होतं.
'एक बात... गेमच्या आधी कुणी पण दारू प्यायची नाही. काम झाल्यावर पायजे तेवढी प्या... माझ्याकडून कळलं... कळलं...' चिन्याने 'कळलं' वर भयानक जोर दिला.
आठ वाजता वखारीत जमायचं ठरलं.
चिनू घरी गेला. आज तो शाळेत जाणार नव्हता. रात्री डिस्पेन्सरीला पण जाणार नव्हता. त्याने फोन करून डॉक्टरला सांगितलं होतं.
बाप ऑफिसला निघून गेलेला. फ्रेश झाला चिन्या. पुस्तक घेऊन बसला. अभ्यासात लक्ष लागेना. सतत तिचा चेहरा, तिच्या वेदना, तिची चीड, तिच्या डोळ्यातला विस्तव त्याला बोचकारीत होता.
बरं वाटत नसल्याचं कारण सांगून तो घरी राह्यला.
एक वाजलेला. शाळेच्या कर्कश घंटेने त्याची तंद्री भंगली. तो बाकड्यावर आला.
शाळा सुटलेली. सगळे जण आनंदात, जल्लोशात धावत सुटलेले. चिनूने पाहिलं, त्या सहा जणी गपगारपणे त्याला येताना दिसल्या. नेहमी खिदळणाऱ्या, बागडणाऱ्या त्या साऱ्या कोमेजलेल्या फुलाप्रमाणे भासत होता. राधेच्या चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालेलं.
नजरानजर झाली त्यांची आणि चिनूची. चिनूचं घर कदाचित माहीत होतं त्यांना.
राधेनं चिडीच्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. चिनूच्या पापण्या खाली झुकल्या. त्या निघाल्या शॉर्टकट गल्लीच्या दिशेने. त्यांच्या नकळत संत्या त्यांच्या मागून अंतर ठेवत चालता झाला.
आऱ्या स्वतः सातव्या गल्लीच्या नाक्यावर असलेल्या गादीवर उभा. फेफ्टी पाचव्या गल्लीतल्या अण्णाच्या हॉटेलवर. मोहन काळ्या तिसऱ्या गल्लीच्या तोंडावर अन् चंग्याने तर थेट मोहल्ल्यात फील्डिंग लावलेली.
चिनू थोड्या वेळाने वखारीत जाऊन बसला. सगळे जण एकमेकांच्या शिट्ट्यांची वाट बघत होते. काही गडबड नाही झाली. मुली सुखरूप आपापल्या घरी पोहोचल्या.
चिन्याला माहीत होतं अल्ताफ काल्या आज तरी कसली डेअरिंग करणार नाही.
आठ, रात्रीचे साडेसात वाजलेत. वखारीत सगळ्या जणांची जमवाजमव होतेय. नऊ जण जमलेले. साताठ जण बाकी होते. ते पण आले.
‘सामान कुणी कुणी आणलंय?' असं चिनूने म्हणताच टेबलावर चॉपर, रामपुरी, वस्तरा, गुप्ती, फाईट पटापट जमा झाल्या.
‘संत्या ठेव सगळं कोपच्यात... आपल्याला अल्ताफ काल्याला फक्त सुजवायचंय... ढगात नाय पाठवायचं... वार करायची कुणी गांडमस्ती करायची नाय. असं पण पुरा मुलीचं मॅटर आहे. कुणी मध्ये पडणार नाही. पडलाच तर बघू काय करायचं ते...' चिनूच्या डोळ्यात रागीट शांतता होती.
'आन्या भेंचोत तू टाकून आला आहेस. तू इथंच थांबायचं, लक्षात ठेव. बोल्लेलो ना दारू पिऊन कुणी गेममधे उतरायचं नाही म्हणून' चिन्या चिडला तसा अन्याने कल्टी मारली.
‘अन् लफडा झालाच तर सगळ्यांना माहीत आहे काय करायचं ते. कडदोडीत सगळा स्टॉक आहे... कुणाला खचकायचं असेल तर आत्ताच कल्टी मारायची काय?’ चिनूने पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्यात पाहिलं.
कल्टी कुणालाच मारायची नव्हती. उलट गेम कधी स्टार्ट होतोय ह्याची सगळे वाट बघत होते. सगळ्यांचे हात शिवशिवत होते.
लहानपणी जसे डब्बा ठो, रडीपाणी, चोर पोलीस खेळतात तशी ही सगळी मोहल्ला आणि कामाठीपुऱ्यातल्या प्रत्येक गल्लीला भिडत आलेली. उलट राडा नाही झाला तर ह्यांचा मूड ऑफ व्हायचा. आत्तापर्यंत चिनूने ह्यांना कंट्रोलमध्ये ठेवलेलं... नाही तर दंगल होऊन अख्खा एरिया बंद झाला असता.
रात्रीचे नऊ वाजलेत. दिप्या आणि संत्या धावत, हसत हसत वखारीकडे आले.
‘भाऊ, अल्ताफ काल्या आलाय कॅरमच्या इथं' संत्याने न्यूज देताच सगळे झपकन उभे राहिले.
'काल्याला मी, अरुण, फेफ्टी नी मौन्या उचलणार. आम्ही चार जण फक्त... लक्ष देऊन ऐका. फक्त आम्ही चौघे, बाकीच्यांनी लांब फील्डिंग लावायची... घाई होऊन काल्या निसटला नाय पाहिजे. मी पहिला समोरून जातो... चंग्या तु गायवाल्याच्या आडव्या गल्लीला असशील. आऱ्या, मौन्या तुम्ही व्यायाम शाळेच्या बाजूने या... चंद्या तू माझ्या मागून ये.. आय्घाल्याला टीप भेटली तर पळून जायचा' बोलून चिन्या निघाला पण.
चाळीपासून मोजक्याच अंतरावर असलेला भिकारी बाजार मोहल्ला. अन्वरच्या गाळ्यात तीन कॅरम लागलेत.
बल्बचा प्रकाश बोर्डवर पडलाय...
या खेळात खेळाडूंचं खेळावर भयानक कॉन्संट्रेशन असतं. क्वीन घेतल्यावर करवली म्हणून शत्रूची अजून एक सोंगटी हवी असते.
साला विचित्र खेळ आहे हा... अरे राणी मिळाली ना !!! मग अजून कोण कशाला पाहिजे.... चालायचं... खेळणारा स्ट्राईक घेताना झुकला असताना त्याचा चेहरा साफ दिसतो...
चिनूला वाकलेला अल्ताफ काल्या त्या बल्बच्या प्रकाशात लख्ख दिसला.
राठ काळा, अंगाने भरलेला, पिवळेजर्द डोळे अन् काळे सडलेले दात असलेला काळ्या कपड्यातला, डोक्यावर पांढरी टोपी घातलेला अल्ताफ काल्या. क्वीन मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या अल्ताफ काल्याच्या अगदी मागे चिनू उभा राहिला.
काल्याने स्ट्राईक घेतली! क्वीनच्या रोखाने स्ट्राईक पास केला नी क्वीन निसटली. रिबाऊंड झाली ती. काल्या हिरमुसला.
'रुक रुक... लगा वापीस... लगा ना बे..' काल्याच्या मागे उभा असलेल्या चिनूनं काल्याला मागून ढोपराने ढुशी देत सोंगट्या पुन्हा लावायला सांगितल्या... चिनूला बघून काल्या थरथरला. उठण्याची कोशिश करू लागला.
'बैठ ना गांडू' म्हणत काल्याच्या खांद्यावरची पकड घट्ट करीत चिनू जरबेत म्हणाला.
खेळणारे 'आ' वासून बघू लागले. एकाने तोच पट पुन्हा लावला. चिनूने बसलेल्या काल्यावर मांड्यांची पकड घट्ट करीत बोरिक पावडर हाताला चोळली अन स्ट्रायकर घेऊन राणीवर नेम लावला. उभ्या उभ्याच त्याचा एक हात अल्ताफ काल्याची कॉलर पकडून होता. एका कैचीत पहिली राणी घेतली अन् त्याच स्ट्रायकरने कव्हरचा वेध घेतला वेगाने, ती सोंगटी, राणी नंतर पुढच्या खड्यात घुसली.
'क्या बात है बावा' अल्ताफच्या डाव्या बाजूला उभा असलेला फेफ्टी चीत्कारला.
काल्याला आता त्याच्या सभोवताली अरुण नि फेफ्टी दिसले. आता काल्या टरकला.
‘आ काल्या तेरेको कॅरम कैसे खेलते है सिखाता हुं' म्हणत चिनूने अल्ताफ काल्याला उभा करून त्याच्या हाताची बोटं आपल्या बोटात पकडून जोरात वळवली. काळ्या कळवळला.
‘आजा, लडकी का हाथ पकडता है ना तू गांडू..' म्हणताना चीन्याची लाथ त्याच्या गुप्तांगावर बसली.
सगळा रंग बिघडलेला भिडूंच्या खेळाचा.
‘जाव भाय... मा बहनको मामला है... छेडता है ये गांडू लड़कियों को. फिरभी बीचमें आना है तो आव.. देखते है' म्हणत रावड्या फेफ्टीने पुढे येणाऱ्या एकाच्या छातीवर थाप दिली... तसे बाकीचे पांगले.
चिनूचा रणगाडा सुरू झालेला.
अन्वर तिकडून धावत आला 'ए चिन्या... क्या हो रहा है?'
'लडकी का हाथ पकड़ा था इसने जबरदस्ती करनेकी कोशिश कर रहा था' चिनूने काल्याला वर उचलत खाडकन जोरात टक्कर दिली. फुल फुटला काल्या.
'ये भाय वो सब ठीक है.. मगर इधर मत लफडा करो' अन्वर विनवणी करू लागला. इतक्यात अल्ताफ काल्याचा हात सदऱ्याच्या खिशात गेला. त्याने वस्तरा बाहेर काढला हे नेमकं काळ्या मोहनने पाहिलं. जोरदार लाथ पडली त्याची अल्ताफच्या हातावर आणि वस्तरा हवेत उडाला. काल्याने वस्तरा काढलेला बघून फेफ्टी, आऱ्या आणि मौन्या तिघेही त्याच्यावर तुटून पडले. अल्ताफ काल्या 'अल्ला अल्ला' करत विव्हळत होता.
‘हाफिज भाय, अखलाक, मुन्ना, चांद... भेन्चोद किधर हो...' मार खात खात काल्या त्याच्या साथीदारांना पुकारू लागला.
कोण येणार नव्हतं. त्यांनी ह्या लोकांना बघून लांबूनच धूम ठोकलेली.
चिन्याने अल्ताफचा कब्जा घेतला. 'चंद्या इथे नको... चल ह्याला घेऊ वखारीत' चिनूने फेफ्टीला मारलेला डोळा तिघांनी पहिला.
चौघांनी अल्ताफला फरफटवलं. उभं केलं, गांडीवर लाथ घालून चालायला लावलं.
मोकळं सोडल्याची संधी साधून अल्ताफ काल्या पाचव्या गल्लीच्या दिशेने जीव तोडून धावला.
चिनूला तेच पाहिजे होतं. अल्ताफ ने गायवाल्या किशोरच्या गल्लीत एन्ट्री घेतली अन तिथे उभा असलेल्या चंग्याने धाडकन लाथ घालून त्याला आडवा केला. मागून हे लोक आले.
आता काल्या माफी मागत, रडत प्रत्येकाच्या लाथे सरशी शिस्तीत चालत होता.
‘छोड ना चिन्या भाय... खुदा कसम आगे ऐसा नही होगा' असलं काहीबाही हात जोडत बरळत होता काल्या.
शेवटी वखारीत आणलाच ह्या लोकांनी काल्याला. सगळं चिन्याच्या प्लान प्रमाणे झालेलं.
चिनूने पाकीट काढलं... डिस्पेन्सरीतून मिळालेला अख्खा पगार त्याने पावट्याच्या हातावर ठेवला. 'जा सगळ्यांना पायजे ती दारू आण... पैलवानकडून सल्ली बोटी, सिक कबाब, चिकन तंदुरी आणि तुफानीकडून पाव-भाजी घेऊन ये'
वखारीतलं साठचं बल्ब जळतंय. अल्ताफ काल्या सुन्न बसलाय एका कोपऱ्यात. बाहेर शेकोटीतलं जळतं कोलीथ हातात घेऊन चिनु आत आला. क्या काल्या... इसी हाथ से पकड़ा था ना तूने गांडू उसको?' चिन्याने त्याचा हात खाली ठेवून वरून लाल भडक कोलीथ त्याच्या दोन्ही हातावर जोरकसपणे चिकटवलं.
भयानक कळवळला काल्या 'या अल्ला... गलती हुई... कसमसे अबकी बार किसीके साथ ऐसा नहीं करूंगा... बहन है मेरी... बहन है' काल्या चिनूच्या पायावर कोसळला.
‘और क्या गांडू, कीस मांग रहा था?' पुन्हा लाथ पडली अल्ताफ काल्याच्या थोबाडात.
काल्याला किंचाळता पण येईना. त्याच्या तोंडातून वाहणारं रक्त बघून चिनूला विकृत आनंद झाला.
चिनूची शिकार होता तो. आत्ता त्याच्याशिवाय दुसरं कुणीच त्याला टच करणार नव्हतं. तशी कुणी हिम्मत पण केली नसती.
वखारीत काल्याला पकडून फक्त खास पाच जण हजर होते. बाकीचे बाहेर नाक्यानाक्याच्या कोपच्यात उभे होते. नजर ठेवून.
खाडकन् अजून एक लाथ काल्याच्या पेकाटात बसली. 'मत मारो मालिक... मत मारो भाय... मै अभ्भी उस लडकी की माफी मांगने के लिये रेडी हुं' म्हणत काल्या उठत होता तेवढ्यात अजून एक लाथ बसली.
‘काल्या पडे रह गांडू... उठनेकी कोशिश भी करेगा तो तेरा खतना समझ' चिनू शांतपणे म्हणाला.
पावट्या आला माल घेऊन बाटल्या, चखना, ग्लास सगळंच, चिनूनं दोन बियर, दोन क्वार्टर आणि थोडं खायचं ठेवून बाकीचं पोरांना द्यायला सांगितलं.
'संत्या, आईला सांग आज मी घरी येणार नाही म्हणून... सांग व्यायामशाळेत हनुमान जयंतीची तयारी करतोय' चिनू म्हणाला.
‘संत्या काकूने विचारलं तर सांग हनुमान वखारीत बसलाय. हाहाहा' सुजत चाललेल्या काल्याकडे बघत फेफ्टी म्हणाला.
अऱ्याने ग्लास भरले. चिनूने बियरच्या बाटलीचं बुच दाताने उघडून बाटली तोंडाला लावली.
‘काल्या दारू पियेगा... हा भोसडीके तू तो अंटा, गरद पिता है... तडीपार गांडू. रॉबरी, रेप, मर्डर, किस केस में नहीं फसा है तू? मै यहां तुझे चीर भी दू ना तो तेरी मय्यत उठाने कोई नही आयेगा. बोल युपीसे आके यहां मुबई में क्या क्या कांड किये तूने बोल... बोल....' चिन्याने पुन्हा फटके द्यायला सुरवात केली.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश. पुढे.... प्रकरण २२
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या